तेव्हा येशू त्यांस म्हणाला, हे सर्व तुम्हाला दिसते ना? मी तुम्हांला खचित सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. (मत्तय २४:२)
प्रभु येशूने शिष्यांना भविष्यात्मकदृष्टया सांगितले, भविष्यात येथे काय घडणार आहे आणि ते केव्हा घडणार आहे.
येशूने त्यांस उत्तर दिले, तुम्हांस कोणी फसवू नये, म्हणून सावध असा. (मत्तय २४:४)
फसवणूक ही टाळली जाऊ शकते नाहीतर येशूने तसे म्हटले नसते, "तुम्हांस कोणी फसवू नये, म्हणून सावध असा." सैतान केवळ त्यांना फसवू शकतो जे तसे होऊ देतात. इफिस ६:११ आपल्याला सांगते की, "सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा." देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करणे (इफिस ६:११-१८) ते आपल्याला सैतानाच्या फसवणुकीपासून संरक्षण देईल.
कारण पुष्कळ जण माझ्या नांवाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांस फसवितील. (मत्तय २४:५)
फसवणूक ओळखण्याचा मार्ग हा सर्व चुकीच्या म्हणण्याचे स्पष्टीकरण करणे नाही परंतु त्याऐवजी जे खरे आहेत त्याबरोबर परिचित होणे म्हणजे नकली हे लगेचच ओळखता येईल. जो कोणी देवाच्या वचनात खरेच स्थिर आहे तो फसविला जाणार नाही.
तेव्हा जे यहूदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे; जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरिता खाली उतरू नये. (मत्तय २४:१६-१७)
नवीन करारात येशूने त्याच्या शिष्यांना इशारा दिला की यरुशलेम व मंदिर दोघांचाही नाश केला जाईल. इतिहास प्रगट करते की अनेक ख्रिस्ती लोकांनी येशूच्या ह्या शब्दाचे स्मरण केले, आणि जेव्हा रोमी लोक इसवीसन ६६ मध्ये यरुशलेम ला पहिल्यांदा वेढा देऊन होते, अनेक जण हे यार्देन मध्ये पेला येथे पळाले, जेथे त्यांना आसरा दिला व त्यांचे संरक्षण केले गेले. जे लोक यरुशलेम मध्येच राहिले होते त्यापैकी हजारो हे त्या पवित्र नगरावर कब्जा केल्यावर मरण पावले आणि जे त्यातून निसटले त्यांनी तसे केले कारण त्यांनी त्या वेळेच्या चिन्हाची पारख केली होती आणि जवळजवळ ४० वर्षांपूर्वी ख्रिस्ताने दिलेल्या इशाऱ्या प्रती आज्ञाधारक राहिले!
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. (मत्तय २४:३५)
वाक्प्रचार "नाहीशी होणे" याचा अर्थ "एका अवस्थे मधून दुसऱ्या अवस्थे मध्ये बदलणे". आकाश व पृथ्वी हे बदलतील परंतु देवाचे वचन हे कधीही बदलणार नाही. "देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी योय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो." (२ करिंथ १:२०)
Chapters