त्यादिवशी येशू घरातून निघून समुद्रकिनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. (मत्तय १३:१-२)
तो मचव्यात जाऊन बसला:
येशूने अनेक वेळेला मचवा त्याचे पूलपीट असे वापरले आहे.
तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले:
अनेक वेळेला लोकांनी मला विचारले, "येशूने इतक्या मोठया जमावाला माईक साऊंड नसताना कसे काय बोलले?"
येथेवैज्ञानी स्पष्टीकरण आहे की येशूने इतक्या मोठया जमावाला कसे काय संदेश दिला. दिवसा दरम्यान, वारा समुद्राकडून भूमीकडे वाहतो. येशू नावे मध्ये समुद्राकडे तोंड करून बसला होता आणि म्हणून हे तर्कसंगत आहेकी वाऱ्याने त्याची वाणी समुद्राकडून भूमीकडे आणि ते जे उत्सुकतेने ऐकत होते त्यांच्याकडे आणली.
मग त्याने त्यांना अनेक गोष्टी दृष्टांतानेसांगितल्या ....(मत्तय १३:३)
दृष्टांत काय आहे?
त्याच्या वेळच्या रब्बी प्रमाणे, येशू ने साधे शब्द-चित्र वापरले, ज्यासदृष्टांतम्हणतात, की देवाच्या राज्याविषयी गहन अर्थ सांगावा.
.....तो म्हणाला, पाहा, पेरणारा पेरणी करावयासनिघाला; आणि तो पेरीत असतां काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्यांस फारशी माती नव्हती, आणिमाती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही कांटेरी झाडांमध्ये पडले; मग कांटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको. (मत्तय १३:३-९)
'पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत' हा काही दृष्टांतातील एक दृष्टांत आहे जो तीन वेगवेगळ्या शुभवर्तमान मध्ये आढळतो: मत्तय १३, मार्क ४ आणि लूक ८ मध्ये. ह्या दृष्टांतामध्ये, बी हे चार वेगवेगळ्या मातीत पडले आहे.
वाटेवर
खडकाळीवर
कांटेरी झाडांमध्ये
चांगल्या जमिनीत
वाटेवरील हा मार्ग होता जेथे लोक चालत होते आणि तेथे काहीही वाढू शकत नव्हते कारण माती ही फार कठीण होती.
खडकाळ ठिकाण जेथे माती फार थोडी होती, जी खडकाळीवर राहिलेली होती. ह्या जमिनीवर बी ताबडतोब उगवले कारण माती गरम होती. परंतु बी मूळ धरू शकत नव्हती कारण ती खडकाळ जमीन होती.
कांटेरी झुडुपात वर्णन केलेली जमीन सुपीक होती-कदाचित जास्त सुपीक, कारण तेथे बी बरोबर कांटे सुद्धा वाढतात.
चांगली जमीन वर्णन करते जी सुपीक होती आणि कांटेरी झुडूप सुद्धा नव्हते- एक चांगले, बहुगुणीत होणारे उत्पन्न तेथे वाढते.
दृष्टांत चार भिन्न अवस्था प्रगट करतो ज्यामध्ये मनुष्यांच्याहृदयाचे वर्गीकरण करता येईल. तुम्ही तुमच्या स्वतःला विचारू शकता ह्यापैकी कोणती अवस्था तुमचे वर्णन करते.
मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले,
आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?
त्याने त्यांस उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांस दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. (मत्तय १३: १०-११)
Chapters