तरीपण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखिले; त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जें जें काही चांगले तें त्यांनी राखून ठेविले; त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांस वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला.(१ शमुवेल १५:९)
अर्धवट आज्ञापालन हे धोकादायक आहे.
शौल ने अगाग राजा ला राखून ठेवले. लोकांनी उत्तम मेंढरे व उत्तम बैल राखून ठेविली. लोक केवळ तेच अनुसरतात जे पुढारी करतात.
शौलाने अमालेकी लोकांवर विजय मिळविला परंतु मग तो देवा प्रती आज्ञाधारकपणाचे चिन्ह नव्हता कारण शौलाने परमेश्वराचे निवडक ऐकले.(१ शमुवेल १५:८-९)
तुमचा विजय सुद्धा अवज्ञेमुळे दूषित होऊ शकतो. केवळ तुम्हाला विजय मिळाला याचा अर्थ असा नाही की तुम्ही परमेश्वराची आज्ञा पूर्ण पाळली आहे.
त्याच्या उलट बाजू सुद्धा खरी आहे, केवळ हे कारण की तुम्ही युद्ध हारले आहे याचा अर्थ हा नाही की तुम्ही परमेश्वराची आज्ञा मोडली आहे. तुमच्या अपयशात सुद्धा तेथे आज्ञाधारकपणा असू शकतो.
उदाहरणार्थ: योसेफ ने परमेश्वराची आज्ञा पाळली आणि तरीही तो तुरुंगात गेला. पौल आणि सीला ला शुभवर्तमान प्रचार केल्याबद्दल मारले गेले.
यावरून शमुवेलास संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला.(१ शमुवेल १५:११)
वास्तविकता ही कीपरमेश्वराने शौलाला राजा म्हणून नाकारले होते याचा शमुवेल ला संताप झाल ज्यास त्याने अभिषेक केला होता. मगत्याने संपूर्ण रात्रभर प्रार्थना केली. काहीतरी जे तातडीचे आहे त्यासाठी प्रार्थना करणे ही संपूर्ण रात्र प्रार्थना करणे आहे.
शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेक्यापासून आणिली आहेत; आपला देव परमेश्वर याच्याप्रीत्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेविली आहेत; बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे.(१ शमुवेल १५:१५)
पुढारी हा त्याच्या लोकांकरिता जबाबदार आहे. तो लोकांवर दोष लावू शकत नाही.
पण ज्या लुटीचा नाश करावयाचा होता तीतून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेविली आहेत.(१ शमुवेल १५:२१)
लोकांनी लूट घेतली. शौल हा कमकुवत पुढारी होता.
तेव्हा शौल शमुवेलास म्हणाला, मी पाप केले आहे; मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे; कारण मी लोकांस भिऊन त्यांचे म्हणणे ऐकले. तर आता माझ्या पातकांची क्षमा करा आणि माघारी फिरून मजबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन.(१ शमुवेल १५:२४-२५)
शौलाने परमेश्वराची उपासना केली. अवज्ञेमध्ये सुद्धा कोणी परमेश्वराची उपासना करू शकतो.
Chapters