गडबडीच्या शपथ चे उदाहरण
त्या दिवशी इस्राएल लोक अति क्लेश पावले; कारण शौलाने लोकांस शपथ घातली होती की, मला आपल्या शत्रूंचा सूड घ्यावयाचा आहे, तर संध्याकाळपूर्वी जो कोणी अन्नास स्पर्श करील त्याला शाप लागो; यास्तव त्याच्या लोकांपैकी कोणीही अन्नास शिवला नाही. (१ शमुवेल १४: २४)
जेव्हा शौलास कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्यांस आपल्या पदरी ठेवून घेई. (१ शमुवेल १४: ५२)
शौलाने सतत त्याच्या सेने मध्ये भरती केली. संघ बांधण्याचे हे एक महान उदाहरण आहे.
आपल्या संबंधाचा परमेश्वराला महत्त्व आहे
अहिटूब पुत्रअहीया, ईखाबोद चा भाऊ: ईखाबोद चा उल्लेख हा अनावश्यक असा दिसतो. आपल्यालाहे जाणण्याची काय गरज आहे कीअहीया, जो शौला बरोबर याजक आहे, जोईखाबोद चा भाचा आहे.
तुम्ही कोणाबरोबर संगती करता ते महत्वाचे आहे. कुसंगती चांगल्या चरित्राला वाईट करते (१ करिंथ १५: ३३). याउलट सुद्धा खरे आहे, चांगली संगती, चांगल्या सवयींची उन्नती करते.
शस्त्रवाहक
जेव्हा योनाथानाने सुचविले कीचल आपण त्यांच्यामागे तेथे वर चढून जाऊ, तेव्हा शस्त्रवाहक घाबरला नाही. त्याच्या शस्त्रवाहकाने त्यास म्हटले, "आपल्या मनास येईल ते सगळे करा" त्यात मी आपल्याबरोबर आहे (वचन ७). म्हणून दोघेही त्या कड्यावर चढले, आणि परमेश्वराच्या सहाय्याने त्यांनी शत्रूवर वर्चस्व मिळविले (वचने ८-१४). आपल्याला ह्या तरुण धैर्यवानशस्त्रवाहकाची प्रशंसा केली पाहिजे. तो त्या कड्यावर ती शस्त्रे घेऊन गेला आणि योनाथन बरोबर राहिला. आणि त्याच्या मागोमाग चालला आणि योनाथन ने ज्यांना जखमी केले होते तो त्यांना जिवंत मारीत चालला.
Chapters