“पण तुमचे पूर्वज आपला स्वामी जो परमेश्वर त्याला विसरले. तेव्हा परमेश्वराने त्यांना सीसराचे गुलाम बनू दिले. सीसरा हा हासोर येथील सैन्याचा सेनापती होता. त्यानंतर परमेश्वराने त्यांना पलिष्टी आणि मवाबचा राजा यांचे गुलाम बनवले. हे सर्व तुमच्या पूर्वजांबरोबर घडले. (1 शमुवेल 12:9)
परमेश्वराने अवज्ञाकारी इस्राएलला, कानउघाडणीचा एक प्रकार म्हणून त्यांच्या शत्रू द्वारे वर्चस्वात येऊ दिले की त्यांना पश्चाताप करण्याकडे न्यावे. एक कठीण सत्य जे स्वीकारावयाचे आहे ते हे आहे की देवापासून शिक्षा ही केवळ त्याच्यापासून मिळणाऱ्या सुटके सारखीच धार्मिक आहे.
“तेव्हा मग परमेश्वराने यरुबाबेल (गिदोन), बदान, इफताह आणि शमुवेल यांना पाठवून शत्रूंपासून तुमची सुटका केली. तेव्हा तुम्हाला स्वस्थता लाभली.. (1 शमुवेल 12:11)
शास्तेच्या पुस्तकात, बेदान कधीही प्रगट झाला नाही. हे शक्य आहे की तो सुटका करणारा होता जो त्यांच्या इतिहासात प्रसिद्ध होता परंतु ज्याची कार्ये शास्तेच्या पुस्तकात नोंदलेली नाहीत.
आज गव्हाची कापणी चालू आहे ना? परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्यवृष्टि करावी अशी मी प्रार्थना करीन, म्हणजे मग तुम्ही आपणांसाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. (१ शमुवेल १२: १७)
कापणीच्या वेळी मेघगर्जना आणि पर्जन्यवृष्टि हे त्यांचे सर्व उत्पन्न नष्ट करू शकते. हे दैवी अप्रसन्नतेचे सुद्धा चिन्ह दाखविते..
मूर्ती म्हणजे निरर्थक वस्तू, निव्वळ पुतळे, तेव्हा त्यांची पूजा करु नका. मूर्ती तुमचे रक्षण करत नाहीत की मदतीला येत नाहीत त्या व्यर्थ होत. (1 शमुवेल 12:21)
संदेष्टा शमुवेलाने इस्राएली लोकांना ताकीद दिली की पोकळ गोष्टींच्या पाठीमागे जाऊ नका. त्याने पुढे त्यांना अशी ताकीद दिली की हया पोकळ गोष्टी लाभ देणे किंवा कार्य करण्यात त्यांच्या असमर्थतेद्वारे गुणधर्मित केली जातात.
नवीन करारात आपल्याला अशा खोटया शिक्षकांविरोधात इशारा देण्यात आला आहे ज्यांच्याकडून काहीही लाभ नाही किंवा वचन जे आश्वासन देते ते पूर्ण करण्यात असमर्थ आहेत.
हे खोटे शिक्षक पाणी नसलेले कोरडे झरे व वादळाने पांगविलेले ढग आहेत. खोल अंधारात त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली आहे. (2 पेत्र 2:17)
"ढग जे पाण्यावाचून आहेत, त्यांस वाऱ्याद्वारे वाहून नेले जाते." (यहूदा १२)
तुम्हांसाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो; मी तुम्हांस चांगला व सरळ मार्ग दाखवितो. (१ शमुवेल १२: २३)
प्रार्थनाविरहित राहणे हे पाप आहे. ह्या विषयी आपल्याला प्रामाणिक राहिले पाहिजे. संदेष्टा शमुवेल ने हे स्पष्ट केले जेव्हा त्याने इस्राएल लोकांना आश्वासन दिले की तो त्यांच्यासाठी प्रार्थना करेन:
शमुवेलनेहे ओळखले की देवाच्या लोकांकरिता प्रार्थना करण्यात चुकणे हे देवा विरुद्ध पाप आहे.
प्रभु येशूने मत्तय २६: ४१ मध्ये आपल्याला इशारा दिला आहे: "तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे." प्रार्थनारहित राहणे हे परीक्षेच्या बाणाला आपल्याला मारू देईल जे आपल्याला खोल आणि खोलवर पापा मध्ये नेते.
शमुवेलाच्या भावना दुखविलेल्या असू शकतात की लोकांनी राष्ट्रास महत्त्व देण्याद्वारे त्यास आणि प्रभूला त्यांचा पुढारी म्हणून अस्वीकार केलेला आहे. लोकांप्रती वाईट भावना मनात जतन करून तो ठेवू शकला असता आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करू नये याची निवड केली असती परंतु शमुवेल हा वास्तवात देवाचा एक खरा माणूस होता.
Chapters