गरीबांना धुळीतून उचलून
त्यांचे दु:ख हरण [a] त्यांचा गौरव करुन
त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो,
मानाचे स्थान देतो.
जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली.
सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे (1 शमुवेल 2:8)
काही धार्मिक लोकांनुसार, मग परमेश्वर काहीतरी चूक करणार असेल, कारण तो लोकांना श्रीमंत देखील करतो.
एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. (१ शमुवेल २:१२)
त्यांच्या भ्रष्टपणाचे कारण यामुळे होते की त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. जर त्यांनी परमेश्वराला ओळखले असते तर ते भ्रष्ट झाले नसते. जर त्यांनी परमेश्वराला ओळखण्याचा प्रयत्न केला असता, तर त्यांची एक वेगळी कथा असती.
परमेश्वराला देण्यात येणाऱ्या यज्ञबली विषयी हफनी आणि फिनेहास यांना कोणताही आदरभाव नव्हता हेच यातून दिसून येई. हे परमेश्वराविरुध्द असलेले मोठे पाप होते. (1 शमुवेल 2:17)
नियमशास्त्राने हे निर्देश दिलेले आहे की लेवी लोकांच्या सर्व गरजा या लोकांनी दिलेल्या दशांशद्वारे पूर्ण केल्या जाव्यात (गणना १८:२०-२४; यहोशवा १३:१४, ३३). कारण की एलीचे पुत्र याजक होते, तेव्हा त्यांना अशा प्रकारे पुरवठा केला पाहिजे होता. परंतु एलीच्या पुत्रांनी सत्ता, लैंगिक सुख, संपत्ति आणि नियंत्रणाचे समाधान करण्यासाठी त्यांच्या पदाचा गैरवापर केला. लोक व उपासना या दोन्हीप्रती त्यांनी केलेला अपमान व उद्धटपणाने संपूर्ण याजकपणाच्या प्रामाणिकपणास कमी लेखले होते.
परमेश्वराचे सेवक जेव्हा परमेश्वरास दिलेल्या पैशाला काळजीपूर्वक हाताळीत नाहीत, तेव्हा लोक परमेश्वरास देण्यात येणाऱ्या दानार्पणाचा तिरस्कार करतात. शत्रू मग याचा वापर करतो आणि मग मंडळीमध्ये अनेक विचित्र सिद्धांतास आणतो की लोकांना गरीबच ठेवावे.
एली आता म्हतारा होत चालला. शिलोह येथे येणाऱ्या इस्राएलींशी होणारे आपल्या मुलांचे वर्तन पुन्हा पुन्हा त्याच्या कानावर येऊ लागले. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवेत असलेल्या बायकांशी त्यांनी कसा अतिप्रसंग केला हेही त्याने ऐकले. 23 तेव्हा तो मुलांना म्हणाला, “तुमचे प्रताप माझ्या कानावर आले आहेत. अशी नीच कृत्ये तुम्ही का करता? (1 शमुवेल 2:22-23)
एलीच्या पुत्रांचे पाप
१. हफनी (एक जो त्याच्या मुठीने लढतो)
२. फिनहास (निर्लज्ज मुख)
१. परमेश्वराच्या अर्पणाचा ते गैरवापर करीत होते
२. निवासमंडपाची सेवा करण्यास येणाऱ्या स्त्रीबरोबर ते सहवास करीत होते.
एलीला ठाऊक होते की त्याचे पुत्र अधम आहेत, परंतु त्यांना थांबविण्यास किंवा सुधारण्यास त्याने काहीही केले नाही, जरी जेव्हा परमेश्वराच्या मंदिराच्या पवित्रतेस धोका निर्माण होत होता. याजक म्हणून, एलीने त्याच्या पुत्रांना हाकलून देणे किंवा त्यांचा वध करण्याद्वारे उत्तर दिले पाहिजे होते (गणना १५:२२-३१). यात काही आश्चर्य नाही की तशा परिस्थितीत त्याने काहीही हस्तक्षेप न करण्याचे निवडले होते.
त्यांच्या स्वार्थी कृतीकडे दुर्लक्ष करण्याद्वारे, एलीने त्याच्या स्वतःच्या पुत्रांना त्यांची स्वतःची जीवने व इतर अनेक लोकांची जीवने नष्ट करू दिली. जे आपल्या अगदी जवळ आहेत त्यांच्या जीवनातील गंभीर पापांसाठी त्यांची कानउघाडणी करणे हे विशेषकरून कठीण होऊ शकते. परंतु येथे अशी वेळ येते तेव्हा अशा गंभीर पापांसाठी कानउघाडणी केलीच पाहिजे, जरी जेव्हा प्रक्रिया व परिणाम हे यातनामय असतील.
Chapters