नंतर अम्मोनी नाहाश याने स्वारी करून याबेश-गिलादासमोर तळ दिला; तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहाश यांस म्हणाले की, आमच्याशी करारमदार कर म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ.(१ शमुवेल११: १)
नाहाश नावाचा अर्थ साप किंवा सर्प आहे.ह्या वृतांत मध्ये सैतान, आपला आध्यात्मिक शत्रू, आणि नाहाश, जो इस्राएल चा शत्रू यामध्ये आपण एक समानता पाहू शकतो.
शत्रूचे ध्येय हे आपली आध्यात्मिक दृष्टी कमकुवत करावी (आपले आध्यात्मिक नेत्र)
याबेश येथील लोकांचा उजवा डोळा काढून टाकला तर युद्धात ते कमकुवत होतील. त्याचप्रमाणे, जर आपले आध्यात्मिक डोळे कमकुवत झाले, तर ते आपल्याला आध्यात्मिक युद्धात अप्रभावी करतात.
5 शौल तेव्हा आपली गुरे चरायला घेऊन गेला होता. कुरणातून येतांना त्याने लोकांचा आक्रोश ऐकला. तेव्हा त्याने विचारले, “हे काय चालले आहे? लोकांना शोक करायला काय झाले?”तेव्हा लोकांनी त्याला दूताचे म्हणणे सांगितले. 6 शौलने ते ऐकून घेतले. त्याच वेळी त्याच्यात देवाच्या आत्म्याचा संचार होऊन तो संतप्त झाला. (1 शमुवेल 11:5-6)
तुम्ही जे ऐकता ते महत्वाचे आहे कारण एकतर ते परमेश्वराचा आत्मा तुम्हांवर आणते किंवा भयाचा आत्मा. विश्वास ऐकण्याने येतो, तसेच भय देखील (रोम. १०:१७). या प्रकरणात, जेव्हा शौलाने याबेशच्या लोकांचे शब्द ऐकले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याजवर आला आणि त्यास कार्यरत केले.
म्हणून, पुढील दिवशी, शौलाने लोकांना तीन तुकडीमध्ये विभागिले आणि सकाळच्या प्रहरी ते त्यांच्या छावणीमध्ये आले, आणि सकाळ होईपर्यंत त्यांनी अम्मोन्यांचा वध केला. (१ शमुवेल ११:११)
सकाळच्या पहाऱ्याची वेळ ही पहाटे ३.०० ते सकाळी ६.०० ही होती.
परंतु शौलाने म्हटले,, “नाही, आज कोणाचीही हत्या आता करायची नाही. परमेश्वराने इस्राएलला तारले आहे.” (1 शमुवेल 11:13)
शौल बुद्धिमत्तापूर्वक समजला की त्याच्या शत्रूंचाबदला घेण्याची ही आता वेळ नाही. सैतान, जो नाहाश द्वारे आक्रमण करण्यात अपयशी ठरला होता, तो आता इस्राएलला विजयात सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न करीत होता-राष्ट्राला एकमेकांविरुद्ध विभाजित करून. सैतान हा आपल्यावर कोणत्याही प्रकारे आक्रमण करू शकतो, आणिआक्रमण करण्यास तो विजयाची वेळ नेहमी वापरीत असतो.
Chapters