असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखलत्याच्या डोळ्यांस लावला. (योहान ९:६)
प्रभूने मातीचा उपयोग का केला?
पवित्र शास्त्र सांगते: "मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला." (उत्पत्ति २:७)
कदाचित प्रभूने हे केले हे दाखविण्यासाठी की सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आहे आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही. (योहान १:३)
त्यास हे सुद्धा पाहिजे होते त्याच्या सभोवतालच्या लोकांना हे दाखवून दयावेकी, "ऐकणारेकान व पाहणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वराने केले." (नीतिसूत्रे २०:१२)
आणि हा तोच परमेश्वर आहे जो शरीरात प्रगट झाला आहे.
आणि त्याने त्याला म्हटले, जा; शिलोह(म्हणजे पाठविलेला) नांवाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. (योहान ९:७)
जेव्हा आंधळा मनुष्य त्याच्या डोळ्याला चिखल लावलेला असा जात होता, तेथे काही लोक असू शकतील ज्यांनी त्याला निरुत्साहित केले असेन परंतु तो शब्दावर ठाम राहिला.
तथापि, यहूद्यांनी त्यादृष्टि प्राप्त झालेल्या माणसाच्या आईबापाला बोलावून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा असून आता डोळस झाला आहे, हे खरे मानिले नाही. (योहान ९:१८)
येथे नेहमीच शंका घेणारे आणि प्रश्न विचारणारे असतील. म्हणजे एक चमत्कार हा एका पुराव्याने मान्य करावा लागतो.
वैद्यकीय पुरावा हा एक चमत्काराची उत्तम मान्यता आहे. तसेच, ज्याने चमत्कार प्राप्त केला होता त्या मनुष्याच्या भोवतालच्या लोकांचे म्हणणे हे महत्वाचे होते.
त्याच्या आईबापांनी उत्तर दिले, हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला हे आम्हांला ठाऊक आहे; तरी आता त्याला दृष्टि कशी आली हे आम्हांला ठाऊक नाही; किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हांला ठाऊक नी, त्याला विचारा, तो वयांत आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल. (योहान ९:२०-२१)
त्याच्या आईबापांनी यहूद्यांच्या भीतीमुळे स्वतःच्या मुलाचा त्याग केला होता.जेव्हा तुम्ही सत्यासाठी उभे राहता तेव्हा अस्वीकार केले जाणारव जे तुमच्या घनिष्ठतेत होते त्यांच्याद्वारे त्यागले जाणार हे मानून चाला.
Chapters