तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. (योहान १६:१)
वचन आपल्याला तयार करते म्हणजे आपण अडखळण्यापासून वाचावे.
ते तुम्हाला सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो अस वाटेल, अशी वेळ येत आहे. (योहान १६:२)
प्रभु येशू भविष्यात्मक दृष्टिने त्याच्या शिष्यांना तयारकरीत होता जे येणार होते. येशूचे वचन आज सुद्धा लागू आहे.
'ते तुम्हाला सभाबहिष्कृत करतील,'
आजच्या धार्मिक प्रचलित गोष्टींपासून येशूच्या खऱ्या शिष्यांचा अस्वीकार केला जाईल. त्यांना वाळीत टाकून त्यांना बहिष्कृत करण्यात येईल.
पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो अस वाटेल, अशी वेळ येत आहे.
अंधकाराच्या युगादरम्यान, क्रांतिकारी लोकांनी असंख्य यहूदी व अरब लोकांना देवाच्या नावात जिवंत मारले. आज सुद्धा, लोकत्यांच्या देवाच्या नांवात अनेक लोकांना जिवंत मारण्याद्वारे देवाला सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हेच काय ते प्रभूने उघडपणे बोलले.प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो अस वाटेल. असे लोक सैतानाद्वारे पूर्णपणे फसविले गेले आहेत.
तरी तो सत्याचा आत्मा [सत्य देणारा आत्मा]येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात [संपूर्ण, पूर्ण सत्य]नेईल;
कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार [त्याच्या स्वतःच्या अधिकाराने]नाही; तर जे काही ऐकेल [त्याच्या पित्याकडून]तेच सांगेल; आणि होणाऱ्या गोष्टी [ज्या भविष्यात घडणार आहेत]तुम्हांला कळवील. (योहान १६:१३ ऐम्पलीफाईड)
आत्मा हा जे येशूने त्यांना शिकविले आहे त्याची आठवण देईल; हे आपल्याला चार शुभवर्तमान देते. आत्मा हा त्यांना सर्व सत्यात "मार्गदर्शन" करेल, आणि हे पत्रांमध्ये परिणीत होईल. "तो तुम्हांला येणाऱ्या गोष्टी दाखवेल" हे भविष्यात्मक वचनाचा संदर्भ देते, विशेषतः प्रकटीकरणाचे पुस्तक.
आपण देवाच्या वचनाचा अभ्यास ह्यासाठी करीत नाही कीलोकांबरोबर"धर्म चर्चा' करावी किंवा आध्यात्मिक गोष्ठी आम्हाला किती समजतात ते दाखवावे. आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो की येशू ख्रिस्ताला पाहावे, देवाला उत्तम असे समजावे, त्यास आपल्या जीवनात गौरव दयावे.
Chapters