सैतान तुमच्या मनात विचारटाकू शकतो काय?
बायबल विविध परिस्थिती दाखवितात जेथे विश्वासणारे व अविश्वासणारे या दोघांनाही सैतानाने मोहात टाकले आहे.
पहिले उदाहरण हे १ इतिहास २१:१-२ मध्ये सापडते, राजा दावीद (एक विश्वासणारा)असे म्हणतात की सैताना द्वारे चीथाविला गेला की देवाच्या इच्छे विरुद्ध जनगणना करावी.
सैतान[किंवा शत्रू] इस्राएल विरोधात उभा ठाकला आणिदाविदालाप्रवृत्त केलेकी जनगणना करावी.
नंतर सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करावयास दाविदाला प्रवृत्त केले. दाविदाने यवाबास व लोकांच्या सरदारांस सांगितले, जा, बैर-शेबापासून दानापर्यंत इस्राएलाची मोजदाद करून मला कळवा म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. (१ इतिहास २१:१-२)
सैतानाने दाविदाच्या मनात एक दुष्ट कल्पना घातली.
तसे, संध्याकाळच्या भोजनादरम्यान,शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्यांच्या मनात त्याला धरून दयावे असे सैतान घालून चुकला होता. (योहान १३:२ ऐम्पलीफाईड)
सर्व शिष्य व स्वतः येशू त्या खोली मध्ये असताना, यहूदाला त्याच्या मनात हा विचार टाकला गेला असेन. नाहीतर, सैतानाला स्वतःला किंवा त्याच्या योजनेला इतर सर्वांना उघडे करावे लागले असते.
हनन्या नांवाचा कोणीएक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेविला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तूं पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? (प्रेषित ५:१-३)
तिसरे उदाहरण हे प्रेषित ५ मध्ये आहे, जेथे पेत्र चर्च ला दिल्या जाणाऱ्या दाना संबंधितखरे असण्याच्या त्याच्या योग्यते बाबत हनन्याला (तो एक विश्वासू आहे)दोषी ठरवितो. असे दिसते की सैतानाने त्याचे मन स्वार्थी हेतूने भरले आहे (प्रेषित ५:३) की योग्यरीतीने खोटे बोलण्यास परीक्षेत टाकले आहे.
वरील सर्व वचनातून हे स्पष्ट आहे की, सैतान व त्याची भुते आपल्या मनात दुष्ट विचार टाकू शकतात. तथापि, तो आपले विचार जाणू शकत नाही. पवित्र शास्त्र हे सांगत नाही की सैतान तुमचे विचार जाणण्या संबंधी समर्थ आहे. परमेश्वरच केवळ मनुष्याच्या अंतर्मनातील विचार जाणू शकतो. (यिर्मया १७:९-१०; योहान २:२४-२५)
जसे मी अगोदर उल्लेखिले आहे, की सैतान तुमच्या मनात विचार टाकू शकतो परंतु हे तुमच्यावर अवलंबून आहे की त्याविचारावर कार्य करावे किंवा नाही.
येशू, हे जाणून की पित्याने सर्व काही त्याच्या हातात दिले आहे, आणि तो देवापासून आला आहे व देवाकडे जात आहे. (योहान १३:३)
येशू.....
१. हे जाणून की पित्याने सर्व काही त्याच्या हातात दिले आहे
२.तो देवापासून आला आहे
३.देवाकडे जात आहे.
जेव्हा तुम्ही हे जाणता की सर्व काही तुमच्या हातात आहे, तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही कोठून आला आहात व तुमचे अंतिम ठिकाण कोठे आहे, ते तुम्हाला सुरक्षा देतेकीकोणाच्या धमकावण्याकडे न पाहता किंवा कोणालाही न घाबरता लहानातील लहानांची सेवा करावी.
हे इतके महत्वाचे का होते की त्याच्या शिष्यांनी येशूला त्यांचे पाय धुऊ दिले?
जर मी तुम्हाला धुतले नाही, तरमाझ्याबरोबर तुम्हाला काही वाटा नाही. (योहान १३:८)
तुम्ही ही कल्पना करू शकता काय कीप्रभूलातुमचे पाय धुवावयास पाहिजे? पेत्र ही कल्पना करू शकला नाही. त्याची आश्चर्यचकित प्रतिक्रिया-"प्रभुजी, तूं माझे पाय कसे काय धुऊ शकतो?"-हीच आपली सुद्धा प्रतिक्रिया असू शकली असती.
मला पाहिजे की तुम्ही त्याकडे लक्ष दयावे जे प्रभूने त्यास सांगितले: "मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही."
प्रभु प्रत्यक्षात पेत्राला काय सांगत होता ते हे, "पेत्रा, तूं स्वतःहून माझ्याबरोबर चालू शकत नाही, तूं माझ्याबरोबरप्रचार कार्यात,सेवाकार्यात, आणि प्रभावी कार्य करण्यात चालू शकत नाही, जर तूं मला तुझे पाय धुऊ दिले नाही." मग पेत्र म्हणाला, "प्रभु, केवळ माझे केवळपाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा!" (योहान १३:९)
परंतु येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आहे; आणि तुम्ही शुद्ध आहा.........(योहान १३:१०)
एकदाकी आपण ख्रिस्ताला आपला प्रभु व तारणारा म्हणून स्विकारीले, आपणसंपूर्णस्नान केले आहे, आणि त्याच्या रक्ता द्वारे एकदाच व सार्वकालिकतेसाठी शुद्ध केले गेले आहोत.
त्याच्या रक्ताने आपल्याला सर्वकाळ साठी सिद्ध केले आहे (इब्री १०:१४), आणि आपल्याला केवळ आपले पाय धुण्याची गरज आहे कारण आपण ह्या जगामध्ये चालत आहोत आणि आपल्या पायाला धूळ व माती लागते, जे आपल्याला अडखळण्यास कारणीभूत होते.
तर आज येशू आपले पाय कसे धूत आहे? इफिस ५:२५-२६ आपल्याला सांगते की, "ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठीकी, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करू पवित्र करावे."
आपण, जे मंडळी, ते वचनाच्या पाण्याने स्वच्छ केले गेलो आहोत. जितके अधिक आपण अभिषिक्त शिकवणीच्या अधीन होतो ते वचनाद्वारे ख्रिस्ताला प्रगट करते, तितके अधिक स्वच्छ होत राहतो.आणि जसे आपले पाय धुतले जातात, अडखळण्या ऐवजी, आपणचालत राहणार आणि पळणार सुद्धा!
Chapters