तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरांत राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुम्हांसाठी जागा तयार करावयास जातो. (योहान १४:१-२)
जर तुम्ही संदर्भ पाहिला तर, प्रभु स्वर्गा बद्दल बोलत आहे. येथे अनेक लोक आहेत ज्यांना स्वर्गाचा दृष्टांत झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी विशाल राजवाडे पाहिले आहेत. तथापि, अनेक बायबल विज्ञानी चर्चा करतात की, येशूने स्वर्गातील राजवाड्या संबंधी बोलले आहे काय?
आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठीकी, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. (योहान १४:३)
दुसऱ्या वेळेस येण्याचे आश्वासन
याचा अर्थ काय, येशूचे कार्य करणे आणि महान कार्ये?
"मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. (योहान १४:१२)
१. प्रभूचे आश्वासन हे केवळ शिष्यांसाठीच केलेले नाही परंतु त्या सर्वांसाठी जे विश्वास ठेवतात.
२. प्रभूचे आश्वासन की जी कार्ये त्याने केली ती आपण सुद्धा करू.
३.निष्कर्षात, प्रभु आपल्याला आश्वासन देतो कीत्याने जे केले त्यापेक्षा मोठी कार्ये आपण करू.
येशूने आश्वासन दिले की जी कार्ये त्याने केली ती आपण करू. याचा अर्थ हा आहे काय जे सर्व चमत्कार त्याने केले ते आपण करू?
१ करिंथ १२ मध्ये पौल म्हणतो,
आत्म्याचे प्रकटीकरण सर्वांना सामान्य हितासाठी दिले गेले आहे. कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन दिले आहे .....दुसऱ्याला त्याच आत्म्या द्वारे विश्वास, एखादयाला आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने, एखादयाला अद्भुत कार्ये करण्याची शक्ति ...सर्वच अद्भुत कृत्ये करितात काय? सर्वच अन्य भाषेत बोलतात काय? (१करिंथ१२:७-१०; २९-३०)
जर येशूचा म्हणण्याचा हा अर्थ नव्हता की सर्व विश्वासणारे हे अशा प्रकारेचमत्कार करतील, तर मग त्याचा म्हणण्याचा काय अर्थ होता, जेव्हा त्याने म्हटले, "मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील?"
योहान १७ मध्ये, प्रभु येशूने प्रार्थना केली, "[पित्या], जे काम तूं मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे." (योहान १७:४)
त्याचे कार्य हे जे त्याने केले ते पित्याचे गौरव करण्याकडे लक्ष पुरविण्याचे होते. याचा अर्थ हा आहे की आपण सुद्धा आपले बोलणे व कृत्यांद्वारे येशू ख्रिस्त व पित्याकडे जगाचे लक्ष आकर्षिले पाहिजे.
जर तुम्ही विचार करता की"मोठी कार्ये" म्हणजे "अधिक चमत्कार", तर मग मला हे अजूनही पाहायचे आहे की कोणी ५००० लोकांपेक्षा अधिक लोकांना पाच भाकरी व दोन मासे घेऊन तृप्त केले आहे, हे तर सोडाच की पाण्यावर चालणे किंवा लाजर ला मरून गेल्यानंतर चार दिवसांनी पुन्हा जिवंत करावे.
'येशूची मोठी कृत्ये' यासाठी एक इशारा हा ह्या वाक्यात मिळतो, 'कारण मी माझ्या पित्याकडे जातो'
येशूने आश्वासन दिले की तो पित्याकडे गेल्यानंतर, तो पवित्र आत्म्याला त्यांच्याकडे पाठवेल की त्याने त्यांच्यामध्ये निवास करावा.
मोठी कृत्ये शुभवर्तमानाच्या सामर्थ्याकडे इशारा करते की पवित्र आत्म्याद्वारे जीवने परिवर्तीत करावी जसे ते प्रेषितांच्या साक्षी द्वारे पसरले. पेंटेकॉस्टच्या दिवशी पेत्राच्या भाषणा द्वारे, ३००० लोकांचा नवीन जन्म झाला, कदाचित येशूने त्याच्या संपूर्ण सेवाकार्यात इतके लोक देवाकडे आलेले पाहिले नसेल.
अशा प्रकारे प्रभु आपल्या प्रत्येकाचा उपयोग करतो की त्याचा मृत्यू व पुनरूत्थानाची सुवार्ता पसरावी, आपण ते कार्य करीत आहोत जे त्याने केले आणि त्यापेक्षा मोठे कार्य ह्या अर्थाने की नवीन करार हा जुन्या पेक्षा उत्तम आहे. (इब्री ८:६)
Chapters