प्रार्थने मध्ये आपले डोळे बंद करणे गरजेचे आहे काय?
दोन प्रसंगी, जेव्हा येशूने त्याच्या पित्याकडे प्रार्थना केली, त्याने त्याचे डोळे स्वर्गाकडे केले (योहान ११:४१; १७:१).
दुसऱ्याबाजूने, जेव्हा एक कर वसूल करणाऱ्याने प्रार्थना केली, "त्याने त्याचे डोळे असे स्वर्गाकडे केले नाही." (लूक १८:१३)
बायबल हे स्पष्ट करीत नाही की आपण आपले डोळे बंद करावे किंवा उघडे ठेवावे. अनेक जण त्यांचे डोळे बंद करतात की सभोवतालच्या गोष्टींद्वारे त्याना अडखळण होऊ देऊ नये.
सार्वकालिक जीवन हेच आहे की, तूं जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तूं पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. (योहान १७:३)
सार्वकालिक जीवन हे देवा विषयी जाणणे नाही परंतु एक व्यक्तिगत घनिष्ठ संबंधाद्वारे पिता व त्याच्या पुत्राला जाणणे आहे.
जे काम तूं मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. (योहान १७:४)
लक्षात ठेवा, प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही देवाने दिलेले कार्य पूर्ण करता तुम्ही देवाला पृथ्वीवर गौरव करिता.
तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तूं आपणांजवळ माझे गौरव कर. (योहान १७:५)
हे वचन स्पष्टपणे प्रभु येशू ख्रिस्ताचे दैवत्व प्रगट करते.
हे होऊ शकते काय की यहूदा हा नरकात असेन?
जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तूं मला दिलेल्या तुझ्या नांवात [तुझे ज्ञान व तुझ्या उपासने मध्ये]मी त्यांना राखिले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय [यहूदा इस्कर्योत-एक जो आता विनाशाकडे गेला आहे, शेवट होण्याकरिता ठरलेला]त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. (योहान १७:१२ ऐम्पलीफाईड)
वरील वचन ह्या वास्तविकतेबद्दल विश्वास देते. तसेच, यहूदा इस्कर्योत, ज्याने येशूला फसविल्यानंतर, पश्चाताप करण्याऐवजी आत्महत्त्या केली.
Chapters