माझ्यातील फळ न देणारा [जे फळ देणे थांबते]प्रत्येक फाटा तो काढून टाकतो [त्याची मशागत करतो, त्यास कापतो]; आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. (योहान १५:२)
छाटण्याच्या तीन-पदरी उद्देशाकडे लक्ष दया
१. की त्यास अधिक फळ यावे
२. की भरपूर फळ आणावे
३. की अति उत्तम फळ निर्माण करावे.
ख्रिस्ती जीवनात हे असे स्वच्छ करणे व छाटणे कसे होते?
तुम्ही वचनामुळे, अगोदरचशुद्धकेले व छाटले गेले आहात.
जे मी तुम्हाला दिले आहे [शिक्षण ज्याची चर्चा मी तुम्हांबरोबर केली]. (योहान १५:३)
वचन मुख्यतः दोन गोष्टी करते
१. शुद्ध करते
२. छाटते
येशूनेत्यासारखेच वचन कोठे म्हटले हे तुम्हाला माहीत आहे काय?
हे ते म्हाडीवरच्या खोली मध्ये जेथे प्रभु येशूनेत्याच्या शिष्यांचे पाय धुतले होते. तुम्हाला आठवते काय की पेत्राने त्यास विनंती केली होती की केवळ त्याचे पाय नाही तर संपूर्ण शरीर धुवावे? येशूने त्यांस उत्तर दिले होते, "ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही; कारण तो सर्वांगी शुद्ध आहे. (योहान १३:१०)
एकव्यक्ति म्हणून जे येशू मध्ये विश्वास ठेवतात तेआपण येशूच्या रक्तामध्ये धुऊन शुद्ध केलेले आहोत. आपण स्नान घेतले आहे. आणि ह्या वचनानुसार, आपल्याला प्रतिदिवशी आपले पाय धुण्याची गरज आहे.
प्रतिदिवशी आपले पाय धुणे याचा अर्थ काय आहे?
आपल्याला प्रतिदिवशी वचनात गेले पाहिजे म्हणजेपरमेश्वर, "वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करू शकतो." (इफिस ५:२६)
माझ्यामध्ये राहा, आणि मी तुमच्यामध्ये राहीन. [माझ्यामध्ये जगा आणि मी तुमच्यामध्ये जगेन]. जसे फाटा वेळात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून [घनिष्ठतेत एक झाल्यावाचून] तुम्हांलाही देता येणार नाही. (योहान १५:४)
लक्षात घ्या, ते म्हणते 'राहणे', भेट देणे नाही. परमेश्वर निवास करण्याची इच्छा करतो केवळ औपचारिक भेट देण्याची नाही. फळ देण्याचे गुपित हे त्याच्याबरोबर राहणे/एक होणे होय.
तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हांमध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल. (योहान १५:७)
अट : जर तुम्ही माझ्यामध्ये राहिला, आणि माझी वचने तुम्हांमध्ये राहिली.
१. त्याच्यामध्ये राहणे
२. त्याचे वचन आपल्यामध्ये राहणे
परिणाम:जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल.
उत्तरीत प्रार्थनेचे हे गुपित आहे.
मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करितो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळविले आहे. (योहान १५:१५)
बायबल मध्ये देवाचा सेवक असणे हे लाजेचे कारण नव्हते, ते एक पद व मोठया सन्मानाचे स्थान होते. मोशे, यहोशवा व दावीद या सर्वांना देवाचे सेवक म्हटले आहे. प्रेषित पौलाने स्वतःला प्रभु येशू ख्रिस्ताचा दास अशी ओळख दिली आहे, जे त्याने सुद्धा एक सन्मान असे समजले आहे.
पौला कडून, येशू ख्रिस्ताचा (मशीहा) एक बंदिस्त गुलाम (अर्थ दास), ज्यास प्रेषित [एक विशेष प्रचारक]होण्याकरिता बोलाविण्यात आले, देवाच्या सुवार्तेकरिता [शुभवार्ता] वेगळा केलेला [प्रचार करण्यासाठी]. (रोम १:१ ऐम्पलीफाईड)
परमेश्वर आपल्याला एका मोठया घनिष्ठ संबंधाच्या स्तरात येण्यासाठी बोलावीत आहे, म्हणजे आपण आपल्या प्रभूची वाणी ऐकू शकावे जो आपल्याला त्याचे मित्र म्हणतो, काय सौभाग्य!
Join our WhatsApp Channel

Chapters