त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो; मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नांवाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो. (योहान १०:३)
द्वारपाळ कोण आहे?
मुख्यत: पवित्र आत्मा हा द्वारपाळ आहे.
तथापि, पास्टर, वडील व इतर ख्रिस्ती पुढारी यांनी येशूच्या वतीने त्याच्या शिष्यांचे रक्षण करणे व त्यास संरक्षण देणे अपेक्षित आहे ते द्वारपाळ आहेत.
त्याच्या मेंढरांना नांवाने हाक मारणे हे घनिष्ठ संबंधा विषयी बोलते.
भविष्यात्मक सेवाकार्यात नांवाने हाकमारणे हे केवळ युक्ति नाही परंतु हा एक मार्ग आहे हे दाखविण्यासाठी की परमेश्वर त्याच्या लोकांना ओळखतो.
तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात. (योहान १०:४)
लक्षात घ्या, मेंढपाळ त्याच्या मेंढरांच्या पुढे जातो. दुसऱ्या शब्दात, तो त्यांचेमार्गदर्शन करीत आहे, त्यांना हाकारत नाही.
तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा ल्होता. (योहान १०:२२)
पुनःस्थापनेचा सण हा यहुद्यांचा यरुशलेम वर ताबा घेतलेल्या सिरीयन लोकांवर विजय मिळविल्या नंतर १६४ ख्रिस्तपूर्व काळात यरुशलेम मध्ये दुसऱ्यांदा बांधलेल्या मंदिराच्या पुन्हा समपर्ण करण्याच्या उत्सवाचा सण होता.त्यांच्या साम्राज्यात एकता आणण्याच्या प्रयत्नात, सिरीयन लोकांनी तीन वर्षापूर्वी यरुशलेमच्या मंदिरात झियस दैवतासाठी वेदी स्थापिली होती, यहूदी लोकांना चीडीस आणले होते, आणि शेवटी त्यांच्या शस्त्रासह विजयी बंड करण्यास चीथविले होते.
पुनःस्थापनेच्या सणाचे सध्याचे नाव हे हन्नुका आहे आणि तो डिसेंबर महिन्यात साजरा करतात. हन्नुका सण आठदिवस व रात्र साजरा केला जातो. त्यास दिव्यांचा सण सुद्धा म्हणतात.
Chapters