तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिला आहा; आता उत्तरेकडे वळा. (अनुवाद २: ३)
ते४० वर्षे गोल गोल फिरत राहिले. जीवन हे नित्याचे आणि नीरस असे होऊन गेले होते.
चालणे हे दिशा दाखवीत नाही. कार्यरत राहणे हे फलदायकपणाचे दर्शकनाही आणि जरी ते काही प्रसंगी चालत होते परंतु ते कोठेही पोहचत नव्हते. येथे काही लोक आहेत, जर तुम्ही त्यांना आज पाहाल, ते तेथेच आहेत जेथे तुम्ही त्यांना ४० वर्षांपूर्वी सोडले होते. खरी प्रगती नाही. हे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचे वर्णन करते काय?
नवीन करारात सर्वात प्रसिद्ध एदोमी व्यक्ति हा कदाचितमहान हेरोद होता. यहूदी लोकांद्वारे त्याचा द्वेष केला जात होता कारण तो एदोमी होता परंतु त्यास पाहिजे होते की त्यास एक यहूदी असे जाणावे आणि सन्मान करावा.
त्यांच्याशी झगडू नका, कारण त्यांच्या देशातली तसूभरही जमीन मी तुम्हांला देणार नाही: (अनुवाद २: ५)
इस्राएल हे केवळ जिंकणारी सेना नव्हते, कीमनात येईल ती भूमी हस्तगत करावी. हा कदाचित प्रबळ असा पुरावा होता की केवळ एदोम ची भूमी ही घ्यावी, परंतु इस्राएल ने तेच प्राप्त केले जे परमेश्वराने त्यांना आश्वासन दिले होते.
आपल्यापेक्षा जे कमकुवत आहेत त्यांना आपण कशी वागणूक देतो हेनेहमीच चारित्र्याचे चांगले प्रमाण आहे. जेव्हा आपल्याकडे इतरांवर वर्चस्व करण्याची किंवा गैरव्यवहार करण्याची क्षमता आहे आणि आपण तसे करीत नाही, तर ते हे दाखविते की आपल्याकडे चांगले चारित्र्य आहे. कारण अशा काही कारणांसाठी, परमेश्वराने इस्राएल ला आदेश दिला होता की एदोम सारख्या कमकुवत राष्ट्रांशी सुद्धा चांगला व्यवहार ठेवावा.
बायबल मध्ये एक सर्वात प्रसिद्ध मवाबीव्यक्ति ही, रुथ होती. ती मवाबी स्त्री होती, जिने इस्राएली व्यक्ति, ज्याचे नाव बवाज शी विवाह केला होता, आणि राजा दावीद ची आणि मशीहा च्या एक वंशजाचीआजी झाली होती.
कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे; ह्या मोठयारानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे; आज ही चाळीस वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे; तुला कशाचीही वाण पडली नाही. (अनुवाद २: ७)
ते त्याच डोंगराभोवती फिरत होते आणि तरीही त्यांना कशाचाही उणीव नव्हती.
"आणि माझा परमेश्वर तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पूर्ण करील." (फिलिप्पै ४: १९)
महाकाय
पूर्वी तेथे एमी लोक राहत होते; ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ, पुष्कळ व धिप्पाड होते; अनाकी लोकांप्रमाणे त्यांनाही रेफाई [महाकाय आकाराचे]म्हणतात, पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात. (अनुवाद २: १०-११)
त्याला सुद्धा रेफाईचा देश म्हणतात; पूर्वी तेथे रेफाई राहत असत; अम्मोनी लोक त्यांना जमजुम्मी म्हणतात; ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ, पुष्कळ व धिप्पाड होते; पण परमेश्वराने अम्मोन्यांकरवी त्यांचा संहार केला; त्यांनी त्यांस हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली. (अनुवाद २: २०-२१)
परमेश्वराने महाकाय लोकांचा नाश केला जे मवाबी आणि अम्मोनी लोकांविरुद्ध आले होते. तो हे त्याच्या लोकांकरिता करणार नाही काय?
जेव्हा ते तुमच्या विषयी बातमी ऐकतील, ते दहशत व भीती ने थरथर कापतील (अनुवाद २: २५)
परमेश्वर काय करीत आहे त्याविषयी लोकांनी बातमी ऐकली पाहिजे.
परमेश्वराने म्हटले तुमच्या सहकारी कामगार वर्गाला हे सांग.
Chapters