तुम्ही जे काही कराल त्यांत तुम्हांला यश मिळावे म्हणून ह्या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. (अनुवाद २९: ९)
जेव्हा आपण वचन पाळतो, संपन्नता हा त्याचा परिणाम आहे. वचनास आचरणात आणणे हा संपन्न होण्याचा परिणाम आहे.
आता पवित्र शास्त्रातून संपन्नता ही केवळ पैसा नाही, परंतुसर्वांगीणदृष्टया संपन्नता-आध्यात्मिक, शारीरिक, आर्थिक इत्यादी.वचन आचरणात न आणण्याचा परिणाम हा गरिबी आहे.
जर जुन्या कराराची आज्ञा पाळणे संपन्नता आणते तर मग "उत्तम करार" (इब्री ८: ६) पाळल्याने अधिक उत्तम संपन्नता प्राप्त होईल.
कोणाचा तरी अनुभव देवाचे वचन नाकारण्यात होऊ शकत नाही.
प्रार्थना करून सुद्धा जर कोणी स्वस्थ झाला नाही याचा अर्थ हा नाही की परमेश्वर स्वस्थ करीत नाही. जरी कोणी खूप दानधर्म केले तरी तो संपन्न झाला नाही याचा अर्थ हा नाही की दान देणे हे आत्ताच्या साठी नाही.
आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा, व सबोयीम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्यांचाही केला आहे, हे त्यांना दिसेल. (अनुवाद २९: २३)
अदमा व सबोयीम ही दोन नगरे सदोम व गमोराच्या जवळच्या भागात होते ज्यांनी तेच संकट भोगले जे सदोम व गमोरा ने भोगले.
"ज्या गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत; ह्याचा हेतू हा की, ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावी." (अनुवाद २९: २९)
सर्व जीवन हे आधारभूतरित्या दोन भागात विभागले जातात. येथे काही गोष्टी आहेत ज्यास देवाने गुप्त ठेवले आहे, गोष्टी ज्या तुम्हांला ठाऊक नाहीत; गोष्टी ज्या तुम्ही समजत नाहीत. मग येथे त्या गोष्टी आहेत ज्या परमेश्वराने प्रगट केल्या आहेत, गोष्टी ज्या त्याने तुम्हांला सोपविल्या आहेत.
एक ख्रिस्ती म्हणून, हीअपेक्षा करा कीप्रश्नाला तोंड दयावे ज्याचे तुमच्याकडे उत्तर नाही. "मलामाहीत नाही", असे म्हणण्यास घाबरू नका.
येथे अशी वेळ येईल जेव्हा जीवनाचा अर्थ कळणार नाही.
अशा वेळी तुम्ही हे म्हटले पाहिजे, मी समजत नाही, परंतु देवाला ठाऊक आहे. गुप्त गोष्टी परमेश्वराच्या आहेत, आणि परमेश्वर ज्यास त्या ठाऊक आहे तो स्वर्गातील माझापिता आहे. अनुत्तरीत प्रश्नांसह विश्वास पुढे चालत राहतो.
तुम्हाला जे ठाऊक आहे त्यासाठी परमेश्वर तुम्हाला जबाबदार धरतो. जे तुम्हांला ठाऊक नाही त्यासाठी तो तुम्हाला जबाबदार धरीत नाही.
Chapters