महाकाय व्यक्तींबद्दल बायबल काय म्हणते?
त्याला सुद्धा महाकाय व्यक्तींचा देश म्हणतात; पूर्वी तेथे महाकायव्यक्ति राहत असत; अम्मोनी लोक त्यांना जमजुम्मी म्हणतात; ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ, पुष्कळ व धिप्पाड होते; पण परमेश्वराने त्यांचा संहार केला; त्यांनी त्यांस हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली. (अनुवाद २: २०-२१)
बाशानाचा राजा हा ह्या रेफाई लोकांचाराहिलेला वंशज होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता; त्याची लांबी तेरा फुट आणि रुंदी सहा फुट होती. तो आज सुद्धा रब्बा नगरात आहे ना? (अनुवाद ३: ११)
गिलादाचा उरलेला भाग आणि सर्व बाशान, अर्थात ओगाचे राज्य, अर्गोबाचा सारा प्रदेश, म्हणजे सर्व बाशान हे मी मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले आहे. ह्यालाचरेफाईचा देश म्हणतात. (अनुवाद ३:१३)
पण तुमच्या पायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला आणि त्याने माझे ऐकले नाही. परमेश्वर मला म्हणाला, पुरे, ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नको. (अनुवाद ३: २६)
ते पुरे झाले! ह्या विषयाच्या बाबतीत माझ्याबरोबर बोलू नका:
परमेश्वराला हे नाही पाहिजे होते की मोशेने ह्या विषयावर त्याच्याशी पुन्हा चर्चा करावी. ह्यासाठी कारण हे होते की त्याच्या मरीबा येथील पापामुळे (गणना २०). खडकाला बोलण्याऐवजी मोशेने खडकाला मारले होते आणि ते सुद्धा एकदा नाही परंतु दोनदा. ह्या कारणामुळे मोशे आश्वासित देशात प्रवेश करू शकला नाही.
मोशे साठी ही अत्यंत कठोर शिक्षा असे दिसते. असे दिसते की केवळ एकदाच चुकल्यामुळे त्यास आश्वासित देशाच्या अगदी जवळ मरावे लागले. परंतु राष्ट्रांबरोबर त्याच्या नेतृवाच्या पदामुळेआणि त्याचा परमेश्वराबरोबर एकमेव संबंध त्याकारणाने मोशे चा न्याय कडक प्रमाणाद्वारे झाला.
शिक्षक आणि पुढारी यांचा कडक प्रमाणाद्वारे न्याय होणे हे योग्य आहे (याकोब ३:१). जरीहे सुद्धा अधार्मिक आहे कीशिक्षक आणि पुढारी यांना एका सिद्ध प्रमाणास जबाबदार असे पाहावे.
ह्या सर्वात वाईट, मोशे ने खडकावरील घटने द्वारे येशूचे तारणाचे सुंदर चित्र मलीन केले होते ज्याने रानात पाणी पुरविले होते. नवीन करार, हे पाणी-पुरविणे, जीवन-देणारा खडक हे येशूचे चित्र आहे हे स्पष्ट करते (१ करिंथ १०: ४). येशू ज्यास केवळ एकदाच मारले गेले, ज्याने सर्वांसाठी जीवन पुरविले जे त्यातून पितील (योहान ७: ३७). येशूला पुन्हा मारणे, किंवा त्यातही त्यास दोनदा मारणे हे अनावश्यक व अधार्मिक असे होईल, कारण देवाच्या पुत्राला केवळ एकदाच त्रास भोगणे आवश्यक होते (इब्री १०: १०-१२).
प्रभु येशू हा आपल्याकडे विश्वासाच्या वचना द्वारे येतो (रोम १०: ८-१०), जसे मोशे ने सुद्धा विश्वासाचे वचन वापरले होते की इस्राएल राष्ट्रासाठी जीवनाचे पाणी बाहेर आणावे.येशूच्या ह्या प्रतिमे विषयी परमेश्वराचा जो हेतू होता त्यास मोशे ने "मलीन" केले होते.
"आणि यहोशवाला अधिकाररूढ कर व त्याला धीर देऊन दृढ कर कारण तोच ह्या लोकांचा पुढारी होऊन त्यांना पलीकडेनेईल आणि जो देश तुझ्या दृष्टीस पडेल तो त्यांना वतन म्हणून मिळवून देईल. (अनुवाद ३: २८)
मोशे ने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले परंतु हा तो यहोशवा होता ज्याने त्यांना त्यांच्या वारस देशात आणले.(अनुवाद ३: २८)
आणि यहोशवाला अधिकाररूढ कर व त्याला धीर देऊन दृढ कर:
मोशे ने सहज वाईट स्वभावाचे चित्र दाखविले असते हे म्हणत, "ठीक आहे, जर मी आश्वासित देशात जाऊ शकत नाही, तर मी इतर कोणाला तरी का प्रशिक्षित करू." परंतु मोशे चे हृदय तसे नव्हते, त्याने लोकांवर प्रीति केलीआणित्यासाठी तो सर्व काही करणार होता कीत्यासतयार करावे की त्यांनी आश्वासित देशात जावे.
Chapters