तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तूं लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. (अनुवाद २८: १)
आशीर्वाद प्रामुख्याने परमेश्वराची वाणी-देवाचे वचन पाळण्यामुळे येतो.
पापकबुली: "परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील, वतुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल; तूं पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही." (अनुवाद २८: १२)
"तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञामी आज तुला देत आहे त्या ऐकून तूं काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तूं खाली नव्हे तर वर राहशील." (अनुवाद २८: १३)
"ज्या गोष्टीविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यापासून उजवीडावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस तर असे घडेल." (अनुवाद २८: १४)
"तू शेतात पुष्कळ बी घेऊन जाशील पण थोडेच पीक गोळा करशील, कारण टोळ ते खाऊन टाकतील." (अनुवाद २८: ३८)
हे वचन हाग्गय १: ६ पूर्ण झाले
तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण टोळ मुळे तुमच्या हाती थोडे लागते.
प्रार्थना: प्रत्येक दुष्ट टोळ जे माझ्या बी ला खात आहे ते येशूच्या नांवात मरून जावो.
" तुझ्या मनाला जी धास्ती वाटेल आणि तुझ्या डोळ्यांना जे दिसेल त्यामुळे तूं सकाळी म्हणशील, संध्याकाळ होईल तर किती बरे! आणि संध्याकाळी तूं म्हणशील, सकाळ होईल तर किती बरे!" (अनुवाद २८: ६७)
आज्ञाधारकपणामध्ये भीतीचे मूळ असू शकते.
Chapters