तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तूं आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेमकरशील. (अनुवाद ३०: ६)
ही कल्पना नवीन कराराच्या आश्वासना मध्ये वारंवार म्हटली गेली आहे, अशा उताऱ्या मध्ये
यहेज्केल ३६: २६-२७: मी तुम्हांस नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांस मांसमय हृद्य देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन.
प्रेषित पौलाने लिहिले की सर्व इस्राएलला वाचविले जाईल (रोम ११: २६)
प्रभु येशूने म्हटले की तो परत येणार नाही जोपर्यंत इस्राएल त्यास मशीहा म्हणून स्वीकारीत नाही: मी तुम्हांस सांगतो, आतापासून तो 'प्रभूच्या नांवाने येणारा तो धन्यवादित,' असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही. (मत्तय २३: ३९)
परंतु हे वचन तर तुझ्या अगदी जवळ, म्हणजे तुझ्या मुखांत व तुझ्या अंत:करणात आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल. (अनुवाद ३०: १४)
परंतु ते काय म्हणत आहे? "वचन हे तुमच्या जवळ आहे, तुमच्या मुखांत आणि तुमच्या अंत:करणात" (ते विश्वासाचे वचन आहे, जे आपण प्रचार करतो) (रोम १०: ८)
तुम्ही वचन तुमच्या अंत:करणात कसे घालता?
हे वचन आपल्याला स्पष्टपणे अंत:करण, हृद्य आणि मन यामधील संबंध दाखविते.
जेव्हातुम्ही वचन घेता आणि म्हणता, आणि ते म्हणत राहता, तेव्हा मग वचन हे तुमच्या आत्मिक मनुष्यामध्ये प्रवेश करतो.
अशा प्रकारे तुम्ही वचन तुमच्या अंत:करणात लपविता.
वचन तुमच्या अंत:करणात लपविण्याचे महत्त्व
स्तोत्रसंहिता ११९: ११ स्पष्ट करते, "मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे."
ह्या वचनाचा पहिला भाग म्हणतो, "मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये...........". देवाची आज्ञा पाळणे ही त्या अंत:करणाची स्वाभाविक प्रतिक्रिया असेल जे देवाचे वचन जपून ठेवते.
पाहा, जीवन व सुख, आणि मरण व दु:ख, ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत. (अनुवाद ३०: १५)
निवड ही आपली आह
तर तुझा खात्रीने नाश होईल आणि यार्देन ओलांडून जो देश तूं वतन करून घेण्यास जात आहेस तेथे तूं फार दिवस राहणार नाहीस, हे मी आज तुला बजावून सांगतो. (अनुवाद ३०: १८)
हे पुरेसे नाही की तुम्ही प्रवेश करावा, तुम्ही स्थापित झाले पाहिजे.
एक व्यवसाय सुरु करणे हे केवळ पुरेसे नाही, त्याची वाढ झाली पाहिजे.
जे स्थान तुझा देव परमेश्वर निवडील तेथे, त्याच्यासमोर सर्व इस्राएल लोक हजर होतील तेव्हा, हे नियमशास्त्र सर्व लोकांना ऐकू येईल असे वाचून दाखीव. (अनुवाद ३१: ११)
त्यांना वचन ऐकायचे आहे. हीच काय ती संपूर्ण प्रक्रिया होती म्हणजे ते त्या भूमि मध्ये स्थापित होतील जेथे देवाने त्यांना बोलाविले होते.
सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरी ह्यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील आणि ह्या नियमशास्त्रातील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील. (अनुवाद ३१:१२)
पुरुष, स्त्रिया, बालके ह्यांनी सुद्धा वचन ऐकावयाचे आहे.
हे येथेच पूर्ण होत नाही, तर नगरातील उपरी आणि प्रवासी ह्यांनी सुद्धा वचन ऐकावयाचे आहे.
अशा प्रकारे देवाचे वचन हे किती महत्वाचे आहे.
Chapters