मात्र त्याने फार घोडे बाळगूनयेत; घोडदळ वाढविण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घेण्यास लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे. राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे; तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये. (अनुवाद १७: १६-१७)
ही दोन वचने शलमोन च्या पतन होण्यामागची कारणे सांगत आहेत-एक सर्वात महान राजा जो कधी ह्या पृथ्वीवर जगला होता.
त्याने केवळ अनेक पत्न्या (विशेषतः विदेशी पत्न्या)बाळगल्या नाहीत, परंतु त्याने त्याजवरप्रीति केली आणि त्यांनी त्यास विदेशी दैवतांच्या मागे लावले.
दावीद आणि शलमोन यांनी अनेक पत्नी ठेवणे यामध्ये काय फरक आहे?
दाविदाच्या सर्व पत्नी ह्या इस्राएली होत्या. शलमोन ने विदेशी पत्नींवर प्रेम केले.
पित्याचेपाप याचा येथे काय संबंध आहे (निर्गम २०: ५ पाहा)
अनेक पत्नी ठेवण्याद्वारे दाविदाने पाप केले. शलमोन ने तेच पाप अधिकपणे विदेशी पत्नी करून केले, स्त्रिया ज्या वाईट प्रभाव टाकणाऱ्या होत्या.
शलमोन हा परमेश्वरामध्ये प्रामाणिक विश्वास ठेवणारा होता काय?
पूर्णपणे![१ राजे ८: २२-६१ पाहा, शलमोन ची महान प्रार्थना!]
Chapters