तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रगट झाला व त्याने तुम्हांला काही चिन्ह किंवा चमत्कार दाखविला, आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हांला प्रत्यय आला, आणि तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हांला सुचविले. तरी त्या संदेष्ट्यांचे किंवा त्या स्वप्न पाहणाऱ्याचे तुम्ही ऐकू नका; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीति करताकी नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहात आहे. (अनुवाद १३: १-३)
जरी तेथे चिन्ह आणि चमत्कार झाले आणि ते निश्चित झाले आणि असा देवाचा मनुष्य म्हणतो की परमेश्वरापासून मागे वळा तर कोणी तसे करू नये.
एक चिन्ह किंवा चमत्कार होणे हे देवाच्या खऱ्या मनुष्याचे दर्शक असे नाही.
काय हा संदेश येशू कडे किंवा त्याच्याकडे निर्देश करतो, हे एक संदेष्टा किंवा देवाच्या एखादया मनुष्याचे खरे दर्शक आहे.
आपल्याला त्या शिकवणीपासून दूर होण्याची गरज आहे जे ख्रिस्ताला उंचविण्याऐवजी मनुष्याला उंचविण्यास पाहतात.
आता ही वेळ आहे की आपल्या पहिल्या प्रीति कडे आपण पुन्हा जावे-प्रभु येशू ख्रिस्त.
आज, जर येथे खरे संदेष्ट्ये आहेत, तर मग चुकीचे संदेष्ट्ये सुद्धा आहेत. येथे अनेक आहेत जे विश्वासपूर्ण लोकांना हेरफार ने केलेले शुद्धवचन शिकवितात. तथापि, येथे काही आहेत जे चुकीचे सिद्धांत शिकवितात.
तर मग पण लहानसहान विषयांवर भांडणे करू नये, जे मुख्य ख्रिस्ती सिद्धांताचा नकार करतात किंवा त्याचा गैरवापर करतातआपण त्यांना टाळण्यास काळजी घेतली पाहिजे.
तुझा भाऊ म्हणजे तुझा सहोदर, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझी प्राणप्रिय स्त्री, तुझा जिवलग मित्र ह्यांच्यापैकी कोणी तुला व तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याची गुप्तपणे फूस लावू लागला-मग ते देव पृथ्वीच्या ह्या टोकापासून किंवा दूरदूरच्या राष्ट्रांचे असोत- तर तूं त्यांच्या म्हणण्यास रुकार देऊ नये आणि त्यांचे ऐकू नये; त्याला अवश्य ठार मारावे; त्याला जिवे मारण्यासाठी त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावे.
मरेपर्यंत त्याला दगडमार करावा; कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून म्हणजे दास्यगृहातून काढून आणिले त्याच्यापासून तुला बहकविण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. हे ऐकून सर्व इस्राएल लोकांना भीति वाटेल आणि तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते पुन्हा करणार नाहीत. (अनुवाद १३: ६-११)
याची पर्वा नाही की नातेसंबध किती जवळचे आहे, जे हे नातेसंबध तुम्हाला परमेश्वरापासून दूर नेण्यास प्रलोभनात पाडतात, तर ते तुम्हाला तोडले पाहिजे. सर्व परिस्थतीत ख्रिस्ता बरोबर तुमचे संबंध हे राखले पाहिजे.
Chapters