मनुष्यवध करणाऱ्या कोणालाही तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे त्ये देशाचे तीन भाग कर. मनुष्यवध करणाऱ्याने तेथे पळून जाऊन आपला प्राणवाचविण्याची केलेली सोय अशी: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठारमारिले, तर त्याने तेथे जावे.
उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आपल्या शेजाऱ्याबरोबर लाकडे तोडावयाला रानात गेला आणि झाड तोडताना त्यावर त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला व ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजाऱ्याला लागली व तो मेला तर त्या माणसाने त्यांतल्या एका नगरात पळून जाऊन आपला प्राण वाचवावा. (अनुवाद १९: ३-५)
यहोशवा २०: ७-९, मध्ये ह्या सहा नगरांची नावे दिली आहेत. यार्देन नदी च्या पश्चिमेला तेथे 3 नगरे होती आणि ३ पूर्वेस होती. सर्व ६ नगरे ही लेव्यांची होती जी ४८ नगरे लेव्यांसाठी वेगळी केली गेली होती त्यापैंकी ती होती, गणना ३५: ६-८ नुसार.
न्यायापासून सुटण्यासाठी ती ठिकाणे नव्हती, परंतु त्याऐवजी ज्याद्वारे न्याय हा उचित केला जावा अशी ती ठिकाणे होती.
सुरक्षित ठिकाणे ही राखून ठेवली होती, जेथे कोणीतरी ज्याने अपघातीपणे कोणाला तरी मारले असेन, त्याने त्या व्यक्तीचे नातेवाईक किंवा मित्र यांच्या बदल्याच्या भावनेपासून वाचावे म्हणून तो तेथे पळून जाऊ शकत होता. एकदाकी तो तेथे पोहचला, ते नगराच्या वडिलांद्वारे,त्यांचा दोष किंवा निर्दोषपणा हा निश्चित करण्याद्वारे योग्य न्यायाची वाट पाहत असे.
आश्रयाची नगरे ही येशू ख्रिस्ताचे सुंदर चित्रण आहे. जसे मनुष्यवध केलेला, त्याचे जीवन गमाविण्याच्या धोक्यात असतो, तो त्या नगराकडे धावतोकीआश्रय घ्यावा आणि सुरक्षित व्हावे; तसेच पापी व्यक्ति सार्वकालिक शिक्षेच्या धोक्यामध्ये असताना येशू ख्रिस्ताकडे धाव घेऊ शकतो आणि सुरक्षितता प्राप्त करू शकतो.
कलस्सै ३: ३ मध्ये जसे पौलाने लिहिले आहे, "तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे."येशू हा आश्रयाचे नगर सारखा आहे जेथे कष्टी आणि पिडीत जण विसावा प्राप्त करतात. पापाच्या अंधारा मध्ये जेथे प्रकाश नाही तेथे तो एका चमकणाऱ्या नगरा प्रमाणे चमकतो. त्याचे द्वार हे नेहमीच उघडे आहे, ते सर्व जो आश्रय शोधत आहे त्यांना आश्रय देण्यास वाट पाहत आहे.
Chapters