ही जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल, त्याचा सर्व मार्गांनी चालाल आणि त्यालाच धरून राहाल. (अनुवाद ११: २२)
नेहमी आपण विचार करतो की आज्ञा पाळणे म्हणजे बंदिस्त होणे किंवा स्वतःचा नकार करणे? स्पष्टपणे अनुवाद ११ दर्शवितेकी देवाच्या आज्ञा पाळल्याने आपल्या जीवनात आशीर्वादित कसा येतो. अध्याय ११ वर एक नजर टाकली तर, आपल्याला दिसते की देवाच्या आज्ञा पाळल्याने आशीर्वाद मिळतो:
- सर्व आदेश पाळ.......म्हणजे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल व तुम्ही दीर्घायू व्हाल. (वचन ८-९)
- विश्वासपूर्वक आज्ञा पाळ....तर मग मी पाऊस पाठवेन. (वचन१३-१४)
- काळजीपूर्वक पाळ.....तर मग परमेश्वर तुझ्या शत्रूंना घालवून देईल. (वचन २३)
आज्ञा पाळण्यासाठी किल्ली? "त्यास धरून राहा." (वचन २२)
आज्ञाधारकपणात चालण्यात याची गरज असते.....
१) वचनात वेळ घालविणे
२) देवाबरोबर वेळ घालविणे
पाहा, आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवीत आहे, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे त्या तुम्ही पाळिल्या तर तुम्हांला आशीर्वाद मिळेल. पण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचा आज्ञा पाळिल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हांला आज्ञा करीत आहे तो सोडून तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांच्या मागे तुम्ही गेला तर तुम्हांला शाप मिळेल. (अनुवाद ११: २६-२८)
आशीर्वाद किंवा शाप. मनुष्याची स्वतंत्र इच्छा आणि निवडीचे सामर्थ्य लागू करावे. परमेश्वर आदेश देतो, परंतु मनुष्य हा स्वतंत्र आहे की त्याने आज्ञा पाळावी किंवा नाही.
आपल्याला आज सुद्धा तीच मुलभूत निवड आहे. आपण आपल्या स्वतःसाठी जगू शकतो किंवा आपण परमेश्वरासाठी जगू शकतो. आपल्या स्वतःचा मार्ग निवडणे म्हणजे रस्ता जेथे संपत आहे त्यावर चालणे होयपरंतु देवाचा मार्ग निवडणे म्हणजे सार्वकालिक जीवन मिळविणे होय. (योहान ५: २४)
Chapters