प्रथम उत्पन्नाचे अर्पण
तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यांत पोहचल्यावर तूं त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील, आणि तुझा देवा परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथम उत्पन्न तूं घरी आणशील तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नांवाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानांत घेऊन जा. (अनुवाद २६: १-२)
प्रथम फळ हा विश्वासाचा सिद्धांत आहे जो देवाने पहिल्यापासून स्थापित केला आहे. इब्री भाषेत, तो शब्द बिकुरीम आहे, आणि त्याचा अक्षरशः अर्थ हा, "एक आश्वासन जे येणार आहे." प्रथम फळ म्हणजे स्थान, क्रम किंवा श्रेणी मध्ये प्रथम, प्रारंभ, मुख्य किंवा सर्वश्रेष्ठ गोष्ट.
प्रथम फळाची कल्पना जी परमेश्वर त्याच्या लोकांच्या मनात पेरत आहे त्याचा कापणी, पुष्कळता किंवा संपन्नते पेक्षा एक मोठा दृष्टीकोण आहे. येशू आणि देवाच्या राज्याच्या येण्यासाठी परमेश्वर मानवजातीला तयार आणि व्यवस्थित करीत होता. नवीन करार पडद्याला उडवून लावतो की प्रथम फळाचा पूर्ण अर्थ प्रगट करावा.
आदाम हा पहिला व्यक्ति होता ज्यास परमेश्वराने निर्माण केले होते. जेव्हा तो पापामुळे दूषित झाला, इतर प्रत्येक जण हे सुद्धा त्यामुळे दूषित झाले. कोणालाहीत्यांच्या स्वतःच्या उपयोगाकरिता देवाच्या ज्ञानाच्या झाडाला आणि मुख्य स्थानास स्पर्श करता येऊ नये. त्याचे फळ हे समर्पित होते जे आदामाने स्वतःसाठी घेतले आणि आपल्या सर्वांवर शाप आणला. आपण आदामाचे पाप घेऊन आहोत कारण तो मनुष्याच्या कुटुंबाचा प्रथम फळ होता.
"तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले,ज्यांनीआदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले; आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे." (रोम ५: १४)
पहिला मनुष्य, आदाम, हा ते सर्व येणार होते त्यांची रचना किंवा पद्धत होता. हे प्रथम फळ, किंवा येणारे आश्वासन" याचा सिद्धांत आहे. तुमच्या जीवनात प्रथम गोष्टींवर तुम्ही जसे कार्य करता ते पुढे येणाऱ्या गोष्टीं किंवा येणारा फलदायकपणा साठी एक पद्धत स्थित करते. कारण आदाम मृत्यू मध्ये पडला, मृत्यू ने राज्य केले जोपर्यंत एक नवीन प्रथम फळ हे पुन्हा पाठविले जात नाही आणि एक नवीन करार हा केला जात नाही-'येणारे आश्वासन.
"कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील, पण प्रत्येक आपआपल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी. (१ करिंथ १५: २२-२३)
आपले येणारे आश्वासन कोण आहे?
परमेश्वराला कुटुंब पाहिजे होते. त्याने पुत्राची पेरणी केली आणि अनेक लेकरांची कापणी केली. येशूला स्वतःला परमेश्वर पित्याला प्रथम फळ असे सादर करावयाचे होते म्हणजे आपण देवाचे पुत्र व्हावे. येशू प्रथम फळ अर्पण झाला. जुन्या कराराने त्यास अस्पष्टपणे दर्शविले परंतु नवीन करार त्याविषयी घोषणा करतो!
रोम ८: २९ मध्ये बायबल घोषित करते:
"कारण ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्याप्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगाऊच नेमून ठेवले; ह्यांत हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा."
येशू हा अनेक भावंडांमध्ये प्रथम जन्मलेला किंवा प्रथम फळ असा आहे, देवाच्या कुटुंबामध्ये भाऊ आणि बहिणी असा. येशू हा आता आपली पद्धत आहे. आता आपण आदामाचे अपयश किंवा निर्लज्जता मध्ये राहत नाही; आपल्याला ख्रिस्ताचा विजय आणि आत्मविश्वास आहे!
येशू हा आपली पद्धत आणि रचना आहे. आपण त्याच्या प्रतिमेनुसार होणार आहोत. तो आपली पद्धत आहे, आणि आपण अनेक रचनेत बनतो. जुन्या कराराने देवाच्या लोकांना आदेश दिला होता की परमेश्वराला सामान्यपणे आणि प्राथमिक पद्धतीने त्यांच्या "प्रथम गोष्टींचा" उत्तम तो भाग अर्पण करावा.
परंतु परमेश्वराबरोबरच्या आपल्या नवीन करारामध्ये,आपण परमेश्वराला आपल्या स्वतःचे सर्वात उत्तम ते पूर्णपणे आणि अधिक संपूर्णरित्या अर्पण करू शकतो जे आपल्या अंत:करणापासून येते.
आपणज्या पद्धतीने ते करतो ते रोम १२: १ मध्ये सारांशीत केले आहे:
"म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हांला विनवितोकी, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे."
जेव्हा आपण आपली शरीरे परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करतो, जुन्या करारामध्ये देवाच्या लोकांनी त्यांची जनावरे आणि उत्पन्नद्वारे जे अर्पण केले त्यापेक्षा अधिक संपूर्णपणे आपण आपल्या सर्व गोष्टीं उत्तम असे अर्पण करतो. आपण परमेश्वराला तसे अर्पण करतो जसे येशूने केले-एक जिवंत अर्पण.
जमिनीचे प्रथमउत्पन्न तूं मला दिले आहेस त्यातले काही मी तुला आणिले आहे. (अनुवाद २६: १०)
आपण परमेश्वराला केवळ ते देतो जे त्याने प्रथम आपल्याला दिले आहे.
आपण ही वास्तविकता नेहमी ओळखली पाहिजे जेव्हा परमेश्वराला देतो
आपल्याकडे जे सर्व काही आहे ते परमेश्वराने आपल्याला दिले आहे आणिजे त्याने आपल्याला दिले आहे त्यातून आपण त्यास परत देत आहोत.
Chapters