आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तूं असे करू नको; कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवाच्या बाबतीत करीत आले आहेत; ते देवाप्रीत्यर्थ आपल्या मुलांमुलीचा देखील होम करीत असतात. (अनुवाद १२: ३१)
ते त्यांच्या देवांसाठी त्यांच्या मुलांमुलींचा देखील होम करीत होते. हे मोलेख ची उपासना करीत होते ह्याचा संदर्भ देत आहे, जेथे कनानी लोक त्यांच्या लेकरांना मोलेख दैवताच्या धातूच्या अग्निमय पुतळ्यावर जिवंत असे अर्पण करीत असत, त्यावेळेस ड्रम च्या आवाजाने लेकरांच्या किंचाळण्याचा आवाज कमी ऐकू येत असे.
इस्राएलानेदैवत मोलेख ची उपासना केली होती हा दु:खद इतिहास आहे. शलमोन ने मोलेख दैवताच्या उपासनेला परवानगी दिली होती, याच्या मूर्तीसाठी मंदिर देखील बांधले होते. (१ राजे ११: ७)
यहूदाचा राजा अहाब ने त्याच्या स्वतःच्या पुत्राला ह्या मोलेख दैवताला अर्पण केले होते. (२ राजे १६: ३)
इस्राएलच्या उत्तरीय वंशाचे एक सर्वात भीषण अपराध हा त्यांनी मोलेख दैवताची उपासना केली होती, ज्यामुळे ते अश्शूरच्या बंदिवासात गेले होते. (२ राजे १७: १७)
यहूदाचा राजा मनश्शे याने त्याच्या पुत्राला मोलेख दैवताला अर्पण केले होते. (२ राजे २१: ६)
प्रार्थना:
पित्या परमेश्वरा, हे प्रभू, असे होवो की मी नेहमीच तुझ्या दृष्टीसमोर चांगले आणि योग्य ते करावे. येशूच्या नांवात. (अनुवाद १२: २८)
Chapters