हे इस्राएला, श्रवण कर; तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तूं आज यार्देन उतरून जाणार आहेस; त्यांची नगरे मोठी व त्यांचे कोट गगनचुंबित आहेत. (अनुवाद ९: १)
तेथे असे काहीही नव्हते की इस्राएल त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याने काही करू शकत होते. परमेश्वराने त्यांना काहीतरी करण्याचे आदेश दिले होते जे त्यांच्या स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे होते.
तर आता हे पक्के लक्षात ठेव की, पलीकडे जात आहे तो तुझा देव परमेश्वरच आहे; तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुडे चीत करील, आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तूं त्यांना घालवून देऊन त्यांचा त्वरित नाश करिशील. (अनुवाद ९:३)
पापकबुली: प्रभु जो माझा परमेश्वर माझ्यापुढे भस्म करणाऱ्या अग्नीप्रमाणे जात आहे.
तुमच्या हृदयात हा विचार करू नका. (अनुवाद ९: ४)
जेव्हा आपल्याला यश मिळते किंवा परमेश्वरा द्वारे वापरले जाते, तेव्हा तेथे ही वृत्ती येते हा विचार करावा की हे ह्या कारणासाठी की आपण काहीतरी विशेष असे आहोत.
माझ्या धार्मिकतेमुळे परमेश्वराने मला ह्या देशात आणले आहे. (अनुवाद ९: ४)
त्याचप्रमाणे तारण हे विश्वासा द्वारे कृपेनेच आहे. हे आपल्या धार्मिकतेच्या कारणामुळे नाही.
दगडी पाट्या म्हणजे परमेश्वराने तुमच्याशी केलेल्या कराराच्या पाट्या घेण्यासाठी मी पर्वतावर चढून गेलो तेव्हा मी तेथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिलो; त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीही प्यालो नाही. (अनुवाद ९: ९)
मोशे ने नियमशास्त्राच्या त्या पाट्या उपास व प्रार्थने द्वारे प्राप्त केल्या. मी विश्वास ठेवतो की आपण अद्भुत प्रकटीकरण हे जेव्हा आपण उपास आणि प्रार्थना करू तेव्हा प्राप्त करू.
परमेश्वराचे भय
कारणक्रोध व संताप विषयी मी घाबरलो होतो जेपरमेश्वरानेतुमच्या विरुद्ध उचलले होते. (अनुवाद ९: १९)
देवाचा संताप पाहून मला भीती वाटली. हे देवाचे भय आहे.
Chapters