मोशे चा आशीर्वाद हा या अध्याया मध्ये सादर केला आहे जे मोशे शिवाय इतर कोणी तरी नोंदले आहे हे स्पष्ट आहे कारण (वचन १ मध्ये), मोशे हा अगोदरच मरण पावला होता असे दिसत आहे, आणि जसे मोशे चे शब्द सादर केले जात आहेत, वाक्यरचना"त्याने म्हटले" (वचने २, ७-८, १२-१३, १८, २०, २२-२४) हे वापरले गेले आहे.
हा अध्याय सुद्धा त्याच प्रभावासारखा आहे जसे इस्राएल ने (याकोब)त्याच्या बारा पुत्रांना आशीर्वाद दिले होते जे उत्पत्ति ४९ मध्ये नोंदले आहे. कारणहा मोशे च होता ज्याने उत्पत्ति ४९ मधील इस्राएलच्या आशीर्वाद ची नोंद केली होती.
लोकांचे प्रमुख एकत्र जमले, इस्राएलाचे वंश एकवटले, तेव्हा तो यशुरुनामध्ये राजा झाला. (अनुवाद ३३: ५)
इस्राएल साठी एक काव्यात्मक नाव, "यशुरून" (३२: १५, ३३: २६; यशया ४४: २), याचा अर्थ "नीतिमान".
रऊबेनाचे लोक मोजके असले तरी तो जिवंत राहो, मृत्यू न पावो. (अनुवाद ३३: ६)
मोशे ने ह्या वंशा मध्ये काही अशक्तपणा पाहिला. पूर्वी, याकोबाने भविष्यवाणी केली होती की रऊबेन वंशाची वृद्धि होणार नाही कारणत्याने त्याच्या पित्याच्या स्त्री बरोबर सहवास केला. येथे मोशे ने प्रार्थना केली की असंख्य लोकांमध्ये त्याचा वंश टिकावा. (गणना १:२१, २: ११ याची तुलना करा)
हे परमेश्वरा, त्याच्या मालमत्तेला बरकत दे, त्याच्या हातचे काम मान्य करून घे; त्याचे विरोधक आणि द्वेष्ट्ये ह्यांची कमर अशी मोड की, ते पुन्हा उठणार नाहीत. (अनुवाद ३३: ११)
हा अद्भुत आशीर्वाद आहे
ते जे लेवी लोकांविरुद्ध उभे राहिले, ते प्रत्यक्षात देवावर आक्रमण करीत होते ज्याची लेवी लोक सेवा करीत होते.
"जबुलूनाविषयी तो म्हणाला, हे जबुलूना, तूं बाहेर जाताना आनंद कर; हे इस्साखारा, तूं आपल्या डेऱ्यात आनंद कर." (अनुवाद ३३: १८)
"जबुलून..........इस्साखार": लेआ पासून झालेल्या ह्या पाचव्या आणि सहाव्यापुत्राच्या वंशासाठी मोशेने प्रार्थना केली की त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात परमेश्वरापासून आशीर्वाद प्राप्त करावेत, विशेषतः समुद्रावरील व्यापारामध्ये.
"जबूलून ला"समुद्रावर"[मासे धरणे, समुद्रावर आणि व्यापारात इत्यादी]संपत्तीची खात्री देण्यात आली, आणि समुद्र तटावर, (खेकडा , जांभळा द्रव जोखेकड्या पासून तयार केला जात होता, आणि काच, जी वाळूपासून केली जात होती.)
Chapters