आणि त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्तरा फिरवावा. (गणना ८: ७)
अधिकतर नवीन जन्म घेतलेल्या बाळांना कमी केस असतात. हे निष्पापपणा बद्दल बोलते.
ह्यानंतर, ते निवास-मंडपात त्यांचे काम करण्यास जाऊ शकतात, कारण तू त्यांना शुद्ध केले आहे, आणि त्यांना एक विशेष अर्पण म्हणून सादर केले आहे. (गणना ८: १५)
देवाच्या कार्याकरिता पुढाऱ्यांना समर्पित करण्याचा मार्ग
१.शुद्धीकरण(हे पावित्रीकरण बद्दल बोलते). ह्यामध्ये उपास आणि प्रार्थना असू शकते.
२. त्यांना परमेश्वरासाठी अर्पण म्हणून सादर कर. (पुढाऱ्यांना समर्पित करण्याबद्दल बोलते)
ते पन्नास वर्षाचे झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्त व्हावे व तेथून पुढे ही सेवा त्यांनी करू नये; पण त्यांनी आपल्या भाऊबंदासह दर्शनमंडपात रक्षकाचे काम करावे, दुसरी काही सेवा करू नये. लेव्यांना सोपविलेल्या कामासंबंधाने तू त्याचे असे करावे. (गणना ८: २५-२६)
ही वचने काही प्रश्ने पुढे आणतात:
लेवी लोकांनी ५० वय झाल्यावर का निवृत्त व्हावे?
निवासमंडपाला सतत हलवीत राहणे आणि त्यातील उपकरणाच्या भारदस्त वस्तू संपूर्ण रानात घेऊन जाण्यासाठी शारीरिक ताकदीची गरज असते; म्हणून तरुण याजकासाठी ते काम सोडले जात होते.
तथापि, वयस्कर याजकांनी काही हलक्या कर्तव्यात मार्गदर्शन करत राहावे आणि तरुण पुरुषांना सल्ला आणि उपदेश द्वारे साहाय्य करावे. परमेश्वर वयस्कर याजकांसाठी पुरवठा करीत होता की देवाच्या राज्यात सतत कार्यरत राहावे.
देवाच्या राज्यात सेवा करण्यापासून कोण केव्हा निवृत्त होतो?
येथे एक संशोधन केले गेले जे अशा सेवेमधून निवृत्त झाले होते. त्यात असे दिसले की ते जे निवृत्त झाले होते त्यांस नेहमी विभिन्न आजारांनी त्रस्त केले होते. तथापि, ते ज्यांचे वय झाले होते की सेवा करण्यासाठी अधिकृत वय हे होऊन गेले होते आणि ते जे निवृत्त झाले होते त्यांच्यापेक्षा ते सुदृढ आणि सक्षम होते,आणि अजूनही ते कार्यरत होते.
ह्या वचनात वयस्कर विश्वासणाऱ्यासाठी आपल्याला महत्वाची समज मिळते. देवाच्या राज्यात कार्यरत राहण्यास निवडणे हे,दोन्ही दृष्टीकोनात,आध्यात्मिक आणि शारीरिकहे बुद्धिमत्तापूर्वक आहे. असे दिसते की देवाच्या राज्यात येथे निवृत्त होणे नाही आहे, केवळ शारीरिक शक्तीच्या कामाकडून, तरुण व्यक्तींना सल्ला आणि मार्गदर्शन देण्याचे कामकरावे.
प्रेषित पौलाने तीताला लिहिले: "त्यावृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करण्यास शिकवावे." (तीताला पत्र २: ४)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३