मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले; ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकूनपरमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. (गणना ११: १)
परमेश्वराला आवडत नाही की त्याच्या लोकांनी कुरकुर आणि तक्रार करावी.
मग परमेश्वराचा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकला, आणि त्याने त्यांना भस्म करण्यासाठी अग्नी पाठविला, आणि त्याने छावणीच्या बाहेरील भागावरील काही लोकांना नष्ट केले.(गणना ११: १)
छावणीच्या बाहेरील भागात का?
जेव्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा अग्नि थांबला. (गणना ११; २)
परमेश्वराचा न्याय व्यक्तीवर, कुटुंबावर आणि राष्ट्रावर सुद्धा मध्यस्थी द्वारे थांबतो.
ठिकाणाचे नाव
ह्यावरून त्या स्थळाचे नाव तबेरा(याचा अर्थ 'जाळण्याचे ठिकाण') असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता.(गणना ११: ३)
येथे नेहमीच नावाच्या मागे कथा आहे जे त्या ठिकाणाला दिले आहे. अनेक वेळेला ठिकाणाचे नाव हे तेथे काय घडले किंवा तेथे सध्या काय घडत आहे त्यावरून दिले जाते.
त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला; आणि इस्राएल लोकही पुन्हारडगाणे गाऊन म्हणाले, आम्हांला खावयाला मांस कोण देईल?(गणना ११: ४)
वाईट संगती, चांगल्या सवयीला भ्रष्ट करते. हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
मिसर देशात आम्हांला मासे फुकट खावयाला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबूजे, भाजी, कांदे लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्नाशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही.(गणना ११: ५-६)
कितीलवकर इस्राएली लोक हे विसरले होते की त्यांच्या मासे,काकड्या, खरबूजे, भाजी,कांदे लसूण यासाठी त्यांना किती मोठी किंमत दयावी लागत होती. त्यांनागुलाम म्हणून मोठी किंमत दयावी लागत होती जे अमानवी स्थितीत राहत होते. त्यांनी नेहमी परमेश्वराकडे सुटके साठी आक्रोश केला होता कारण ते अशी किंमत भरू शकत नव्हते.
एकदाकी परमेश्वराने त्यांना तेथून सोडविले होते,तेसोयीस्करपणे विसरले होते जे परमेश्वराने त्यांच्यासाठी कायकेले होते,आणि तथाकथित काही " गोष्टींसाठी" आक्रोश केला होता जे त्यांनी मागे मिसर मध्ये सोडले होते. आता ते मान्ना मुळे बेजार झाले होते जे परमेश्वर त्यांना पुरवीत होता.
मनोरंजक आहे, की त्यांना मान्ना साठी काम करावे लागत नव्हते,परमेश्वराकडून तो आशीवार्द होता. ते मोफत दिले जात होते तरीही ते त्यामुळे बेजार झाले होते.
सुरुवातीला इस्राएली लोक परमेश्वर जो मान्ना त्यांना पुरवीत होता तो पाहून आश्चर्यचकित झाले होते. परंतु थोड्यावेळा नंतर ते त्या भोजनाने बेजार झाले होते जे दिवस-रात्र त्यांना मिळत होते.
आपल्या आशीर्वाद शी अवगतव्हा
मला खूप वर्षांपासून वाटत आहे कीपरिपक्व ख्रिस्ती लोकांना एक विशेष परीक्षा ही त्यांच्या आशीर्वाद सह अवगत होऊन जाणे ही आहे. जसे एक जग प्रवास करणारा, जो सर्वत्र गेला आणि सर्व काही पाहिले आहे, परिपक्व ख्रिस्ती लोकांनी त्याचा आशीर्वाद हा त्यांना सहज मिळत आहे असे समजू नये आणि त्याशी इतके अवगत होऊन जाऊ नये की जे त्यांना उत्साहित करत नाही जसे त्याने कधी केले होते.
इमर्शन ने म्हटले होते की जर तारे केवळ वर्षातून एकदाच बाहेर आले, प्रत्येकजण त्यांना पाहण्यासाठी संपूर्ण रात्र जागे राहतील. आपण तारे नेहमीच पाहत आहोत की आपण आता त्यांच्याकडे पाहण्यास आपल्याला काही विशेष असे वाटत नाही. आपण आपल्या आशीर्वाद सह अवगत झालो आहोत.
इस्राएली लोक रानात त्यांच्या आशीर्वाद सह इतके अवगत झाले होते, आणि परमेश्वरास लोकांना धडा शिकवायचा होता (गणना ११ पाहा). परमेश्वराने राष्ट्राला प्रत्येक सकाळी स्वर्गीय मान्ना ने भोजन करविले होते, आणि तरीसुद्धा लोक त्यामुळे बेजार झाले होते. "पणआता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्नाशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही." (वचन ६)
मान्नाशिवाय काहीच नाही! ते प्रत्येक सकाळी परमेश्वराचा चमत्कार अनुभवीत होते; तरीही ते आता त्यामुळे उत्साहित होत नव्हते. मान्नाशिवाय काहीच नाही!
आपण आपल्या आशीर्वाद सह अवगत झालो आहोत याचे एक प्रमाण हे टीका करणे आणि तक्रार करण्याचा आत्मा आहे.
देवाचा विचार करण्याऐवजी, की आमच्याकडे काय आहे, आपण त्यास तक्रार करतो आणि त्यास बोलतो, आमची इच्छा आहे आम्हाला काहीतरी वेगळे मिळाले असते. तुम्ही याविषयी खात्रीशीर राहा की, जर जे आपण मागतो ते परमेश्वर आपणांस देतो, तर आपण शेवटी त्याच्याबद्दल तक्रारच करू. व्यक्ति जो त्याच्या आशीर्वाद सह अवगत झाला आहे तो कधीही समाधानी होऊ शकत नाही!
ह्या व्याधी चे आणखी एक प्रमाण हे ती कल्पनाआहे की इतरांना आपल्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे. इस्राएली लोक मिसर मधील त्यांचे भोजन आठवत होते, आणिकाकड्या, खरबूजे, भाजी, कांदे लसूण हेत्यांना पाहिजे होते. ते म्हणत होते, "मिसर मधील लोक आपण आहोत त्यापेक्षा अधिक उत्तम असे आहेत!" दुष्टांच्या संपन्नतेकडे पाहून आपण तक्रार करू लागतो.
कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. (स्तोत्रसंहिता ७३: ३)
उघडच आहे, गुलामिगिरी जी त्यांनी मिसर मध्ये केली होती ते विसरून गेले होते आणि भयंकर बंदिस्तपणा ज्यापासून परमेश्वराने त्यांची सुटका केली होती. भोजनात बदल करण्यासाठी गुलामगिरी ही मोठी किंमत दयावी लागत होती.
म्हणूनपरमेश्वराने मोशे ला म्हटले: "तुझ्यामाहितीतले इस्राएल लोकांचे जे वडील व अंमलदार आहेत त्यांच्यातून सत्तर जण निवडून त्यांना दर्शनमंडपापाशी घेऊन ये व तेथे त्यांनी तुझ्याबरोबर उभे राहावे." (गणना ११: १६)
वडील लोकांचेपहिले कर्तव्य हे मोशे बरोबर देवाच्या उपस्थितीतउभे राहावे.
स्थानांतरीत करणे
मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही. (गणना ११: १७)
परंतु त्या वेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते, त्यांतील एकाचे नाव एलदाद व दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते; ते छावणीतच संदेश सांगू लागले.गणना ११: २६)
एलदाद याचा अर्थ "देवाचा प्रिय"
मेदाद, म्हणजे"प्रिय".
इस्राएली लोकांद्वारे भोजनासाठी निषेध पाहिल्यानंतर, हे दोन हे मोशे द्वारे निवडलेल्या सत्तर जणांपैकी होते की लोकांचा भार वाहण्यासाठी साहाय्य करावे.
सर्व वडिलांना दर्शनमंडपाजवळ येण्यास सुचना देण्यात आली होती की देवाच्या आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त करावे (गणना ११: १६). तथापि, एलदाद, आणि मेदाद हे छावणीतच राहिले होते.
हे स्पष्ट नाही की एलदाद आणि मेदाद हे अवज्ञाकारी होते किंवा त्यांना मागे राहण्याची परवानगी होती; कोणत्याही प्रकरणात, जेव्हा देवाचा आत्मा वडिलांवर आला, एलदाद व मेदाद यांनी सुद्धा देवाचा आत्मा प्राप्त केला आणि त्यांनी छावणीतच भविष्यवाणी केली.
तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत [जोपर्यंत तुम्ही इतके समाधानी होत नाही आणि भयंकर उलट्या करू लागत नाही]आणि तुम्हांला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खाट राहाल; कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गाइले की, आम्ही मिसर देशांतून निघालो तरी कशाला?(गणना ११: २०).
जेव्हा आशीर्वाद हा एक शाप होतो
जेव्हा तुम्हाला तुमचा मार्ग पाहिजे असतो
जेव्हा आशीर्वादाचा गैरवापर केला जातो
लोक ज्यामध्ये मी आहे त्यांचे पायदळचसहा लाख आहे. (गणना ११: २१)
मोशे ने प्रतिक्रिया दिली, जसे आपण नेहमी करतो-त्याचा अनुमान काढू लागतो की परमेश्वर तो विशेष आशीर्वाद कसा देईल. मोशे त्याचा भेद काढू शकला नाही; परंतु देवाने त्यास तसे करण्यास सांगितले नव्हते. परमेश्वर पुरवठा करेल, कारण त्याचा हात तोकडा झाला नाही, ना ही त्याचे सामर्थ्य कमी झाले आहे.
छावणीच्या सर्व बाजूला लावे आले-त्यांच्या किनारी पर्यंत. जेव्हा पवित्र आत्मा हा ओतला गेला त्याने पुरुषांना छावणीच्या मध्यभागी ओढले-देवाच्या लोकांच्या मध्य. लावे घेण्यासाठी त्यांना छावणीच्या बाहेर जावे लागत होते-देवाच्या लोकांपासून दूर, निवासमंडपापासून दूर –देवाच्या उपस्थितीपासून. देवाचेआपल्यासाठी उत्तम हे नेहमीच छावणीच्या मध्यभागी असते, बाहेरील ठिकाणी नाही.
बर्ड फ्लू विषयी भविष्यात्मक वचन
लोकांनी उठून तो सगळा दिवस, सगळी रात्र, दुसराही सगळा दिवस ते लावे गोळा केले; ज्याने सर्वांत कमी गोळा केले त्याचे दहा होमर भरले; आणि त्यांनी ते स्वतःसाठी छावणीच्या चाऱ्ही बाजूस पसरून ठेविले. ते मांस त्यांच्या तोंडात पडते ट पडते, तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला. त्या स्थळाचे नाव किब्रोथहत्तवा असे पडले, कारण ज्या लोकांनी सोस घेतला त्यांची प्रेते त्या ठिकाणी-पुरण्यात आली होती. (गणना ११: ३२-३४)
काही बर्ड फ्लू च्या कारणाने लोक हे मरण पावले होते काय?
देवासाठी भुकेले असणे
त्या स्थळाचे नाव किब्रोथहत्तवा[लैंगिकइच्छेच्या कबरा] असे पडले, कारण ज्या लोकांनी सोस घेतला त्यांची प्रेते त्या ठिकाणी-पुरण्यात आली होती. (गणना ११:३४)
शारीरिक हाव ने त्यांना पाप करावयास लावले
१. जास्त खाणे
२. चुकीचे अन्न खाणे आणि पिणे जे शरीरासाठी हानिकारक आहे
३. उपास आणि प्रार्थने ऐवजी खाण्यास प्राधान्य देणे
४. केवळ भोजनाच्या कारणाने परमेश्वराविरुद्ध कुरूकुर आणि तक्रार करणे
तुमच्या लोभाला शरण जाणे हे तुम्हाला तुमच्या कबरेकडे नेऊ शकते
कितीतरी लोक हे आध्यात्मिक मृत्यूत जगत आहेत कारण ते त्यांच्या शरीराच्या इच्छेची पूर्तता करीत आहेत आणि त्यांच्या वासनेवर कधीही विजय प्राप्त करीत नाहीत? आदाम व हव्वा, एसाव, शमशोन, यहूदा. ज्यांनी शरीराचा लाभ ठेवला त्यालोकांना त्यांनी पुरले.
वडिलांनी परमेश्वराची मंडळी चालविली
किब्रोथ-ह्त्तव्वा येथून कूच करून ते हसेरोथ येथे पोहचले; आणि हसेरोथ येथे ते राहिले. (गणना ११: ३५)
(हेसेर) चा अर्थ आंगण किंवा आतील भाग
हसेरोथ नाव हे हेसेर चा अनेकवचनी प्रकार आहे, याचा अर्थ आंगण किंवा गाव. घरे ही त्यांच्याभोवती रचली जातात आणि निवासमंडप आणि मंदिराला बाहेरील आंगण होते.
मंदिराच्याप्रत्यक्ष भोवतालचा भाग. यहेज्केल चे मंदिर आणि कदाचित शलमोन च्या मंदिराला सुद्धा, आतील आंगण होते.
स्तोत्रकर्त्याने त्या आंगण विषयी गाइले: खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. (स्तोत्रसंहिता ८४: १०)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३