"तो मंडळीला म्हणाला, तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूपासून निघून जा बरे. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका; नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल." (गणना १६: २६)
जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांशी जुडलेले राहता, तुम्ही त्यांच्या पापात सहभागीहोता. ते हे असू शकते की तुम्ही त्यांच्याबरोबर फेसबुक, किंवा इंस्टाग्राम किंवा त्यांचे युट्युब चैनल शी सलग्न होता. प्रत्येकाला त्यापासून वेगळे व्हायला पाहिजे.
मग मोशे अहरोनाला म्हणाला, धुपाटणे घेऊन त्यांत वेदीवरील अग्नि घाल व त्यावर धूप ठेवून त्वरेने तें मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरु झाली आहे. (गणना १६: ४६)
धूप हे प्रार्थनेचे प्रतीक आहे. दाविदाने प्रार्थना केली. "असे होवो की माझी प्रार्थना ही तुझ्यासमोर धूपा प्रमाणे होवो." (स्तोत्रसंहिता १४१: २)
त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व'धुपाने' भरलेल्या सोन्याच्या वाटया होत्या'; त्या वाटया म्हणजे पवित्र जनांच्या 'प्रार्थना' होत." (प्रकटीकरण५:८)
मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोन धुपाटणे घेऊन धावत मंडळीकडेगेला, आणि लोकांत मरीची साथ पसरत असल्याचे पाहून त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित्त केले. (गणना १६: ४७)
अहरोन हा मध्यस्थी करणाऱ्याचे चित्र आहे जो लोकांसाठी प्रार्थना करतो. त्याच्या मध्यस्थीने सर्व लोकांना मरीने जिवंत मारण्यापासून थांबविले.
मृत आणि जिवंत ह्यांच्यामध्ये तो उभा राहिला तेव्हा ती साथ थांबली. (गणना १६: ४८)
एक मध्यस्थ करणारा हा केवळ परमेश्वर आणि लोकांमध्ये उभा राहणारा नाही, परंतु तो मृत्यू आणि जीवन यांच्यामध्ये उभा राहणारा सुद्धा मनुष्य आहे. मध्यस्थीकरणारा साथीला घरात, सेवाकार्यात, शहरात, आणि राष्ट्रात पसरण्यापासून थांबवू शकतो. जर येथे मध्यस्थी करणारा नाही-लोक हे नष्ट होतील.
अशा प्रकारे मध्यस्थी ही अत्यंत महत्वाची आहे.
साथ का येते? परमेश्वर साथ पाठवितो काय? नाही
जोपर्यंत परमेश्वराची उपस्थिती आपल्या भोवती आणि आपल्या मध्ये आहे आपण सुरक्षित आहोत.
जेव्हा ही उपस्थिती निघून जाते (आता मला सर्व काही माहीत आहे असा दावा मी करीत नाही) तेव्हा ती शत्रूला येण्यासाठी दार उघडते.
मला तुम्हाला काही प्रश्न विचारू दया, कृपा करून माझ्यासाठी त्याचे उत्तर दया
जरव्यक्ति बैंक मध्ये काम करीत आहे याचा अर्थ हा आहे काय तो किंवा ती कधीही आर्थिकसमस्येमध्ये येणार नाहीत? आता जसे व्यक्ति जो बैंक मध्ये काम करीत आहे त्याच्यामुळे त्यास आर्थिक समस्या आहेत तर तो व्यक्ति बैंक मध्ये काम करण्याचे सोडून देतो काय.
केवळ याकारणासाठीकी तुम्ही डॉक्टर किंवा नर्स आहात याचा अर्थ हा आहे काय तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. जर डॉक्टर आणि नर्स हे आजारी पडले तर याचा अर्थ हा आहे काय की वैद्यकीय पेशा मध्ये काहीतरी चूक आहे? नाही.
येथे काही लोक आहेत जे म्हणतात मी कसे काय इतरांसाठी मध्यस्थी करू शकतो जेव्हा मला स्वतःला समस्या आहेत. येथे काही लोक आहेत जे म्हणतात ते इतरांसाठी प्रार्थना करीत आहेत तर मग मला समस्या का आहेत? आता तुम्ही हे लक्षात घ्या तसे तथाकथित समस्या ह्या प्रमुख नाहीत परंतु नगण्यविषय आहेत.
मी स्वतः निराशेत आहे तर मग मी इतरांना कसे हसवू शकतो...
सर्कसमधीलप्रत्येक जोकर त्या मुखवट्यामागे हसत नसतो.
काही हे अक्षरशः रडत असतात व तरीही हजारोंना आनंदी करीत आणि हसवीत असतात. ह्यास किंमत भरणे असे म्हणतात. येथे मध्यस्थी मध्ये किंमत भरावयाची असते परंतु पुरस्कार हे भरलेल्या किंमती पेक्षा मोठे असतात.
मध्यस्थी करणारे-हन्ना जी संदेष्ट्री होती..
हन्ना नावाची एक संदेष्ट्रीहोती, ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती; ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ सात वर्षे राहिली होती.
आता ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. (लूक २: ३६-३७)
तिने तिच्या स्वतःच्या डोळ्यांनी परमेश्वराला पाहिले होते. तिने कदाचित त्यास तिच्या हातात घेतले असेन व त्याचे मुके घेतले असेन. लक्षात घ्या ती स्त्री होती जिला तिचे स्वतःचे मुलबाळ नव्हते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३