मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर ह्याच्या मुली पुढे आल्या; त्यांची नावे ही: महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. मोशे एलाजार याजक, सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी त्या उभ्या राहून म्हणाल्या, आमचा बाप रानात मरण पावला; ज्या मंडळीने कोरहाच्या टोळीत सामील होऊन परमेश्वराला विरोध केला होता तिच्यांत तो नव्हता, तर तो आपल्याच पापाने मेला; त्याला मुलगे नव्हते. पण त्याला मुलगे नव्हते एवढयावरूनच आमच्या बापाचे नांव त्याच्या कुळातून का गाळावे? आम्हांलाही आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन दया. (गणना२७: १-४)
पवित्र शास्त्रातील वरील वचने आपल्याला सलाफहादाच्यापाचधैर्यवानमुलींबद्दल सांगतात. ह्या पाच मुली मोशे समोर त्यावेळी आल्या जेव्हा तो इस्राएली लोकांची गणती करीत होता जेणेकरून वतन वाटून दयावे जेव्हा ते आश्वासित देशात आले होते.
येथे ह्या मुलींच्या आईच्या नावाचा उल्लेख नाही, आणि म्हणून येथे त्या अनाथ होत्या असे दिसत आहे-पाच मुली पिता किंवा आई विना.
महत्वाची गोष्ट ही कीत्यांनी अजूनही आश्वासित देशात प्रवेश केला नव्हता, त्यांनी त्यास त्यांच्या डोळ्यांनी अजूनही पाहिले नव्हते परंतु केवळ त्याच्याविषयी ऐकले होते आणि तरीही ह्या मुली विश्वासाने आल्या की वारसा मागावा. ते प्रशंसनीय आहे.
"तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे. एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्यादेखत त्याला अधिकारारूढ कर. (गणना २७: १८-१९)
मोशे हा त्याच्या पुढारीपणाच्या शेवटास आला होता. इस्राएली लोक आश्वासित देशाच्या किनाऱ्यापर्यंत पोहचले होते आणि मोशे च्या अवज्ञेमुळे परमेश्वराने त्यास आश्वासित देशात प्रवेश करू दिला नाही.
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली की सार्वजनिकपणे यहोशवावर हात ठेव की हे दाखवावे की अधिकार हा आता यहोशवाला स्थानांतरीत केला आहे.
तसेच, नवीन करारात सुद्धा जेव्हा डिकन ची निवड केली गेली (प्रेषित६:६) त्यांना प्रेषितांच्या समोर आणण्यात आले, ज्यांनी प्रार्थना केली आणि त्यांच्यावर हात ठेवले. ही कल्पना जुना करार आणि नवीन करार ह्या दोन्ही मध्ये सारखीच आहे; पवित्र आत्मा हा ह्या लोकांमध्ये कार्यरत होता आणि मानवी हात ठेवणे हे केवळ ह्या वास्तविकतेची पुष्टी करतात की परमेश्वराचा हात हा अगोदरच त्यांच्यावर होता.
प्रेषितपेत्र आपल्याला प्रोत्साहन देतो, हे बोलत, "म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठीकी, त्याने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे" (१ पेत्र ५: ६). येथे लीन साठी ग्रीक शब्द याचाअर्थ एका नम्र सेवकासारखे आचरण ठेवावे.
यहोशवा ने लहान गोष्टींमध्ये काही वर्षे मोशे ची सेवा विश्वासुपणे केली आणि मग योग्यवेळी, तो मोठया गोष्टीसाठी परमेश्वराची सेवा करण्यास तयार झाला.
तीच गोष्ट अलीशाच्या बाबतीत झाली जेव्हा त्याने लहान गोष्टींमध्ये महान संदेष्टा एलीयाची सेवा केली होती. अलीशा ला नेहमी "एलीयाच्या हातावर पाणी घालणारा" असे संबोधिले गेले आहे (२ राजे ३:११). ही केवळ त्याचीओळखपत्रे होती.
त्यानेलहानातील लहान कामासाठी सुद्धा सेवा केली. आज, काहीलोक हे दु:खी होतात जेव्हा व्यासपीठावर त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातनाही. ते चर्च किंवा उपासनेला सुद्धा जाण्याचे सोडतात जर त्यांचा सार्वजनिकपणे उल्लेख केला नाही.
अलीशा अवश्य देवाचा एक महान सेवक झाला परंतु त्याने त्याचे प्रशिक्षण एक सेवक म्हणून प्राप्त केले! हाच केवळ एक मार्ग आहे ज्याद्वारे खरे आध्यात्मिक पुढारी हे निर्माण केले जातात. त्यामध्ये इतरांची सेवा करण्याद्वारे नम्र होणेआणि ज्यांची सेवा आपण करीत आहोत त्याकडून शिकणे हे त्यात सामाविलेले आहे. कोणीतरी म्हटले आहे, "आपण अनुकरण करण्याद्वारे पुढारपण करण्यास तयार करू शकतो."
त्यातआपल्या कर्तव्याचा काही मोठेपणा किंवा लहानपणा हा महत्वाचा नाही परंतु आपल्या हृदयाचे अधीन होण्याचे आचरण.
तुम्हाला पुढच्या स्तरावर जायचे आहे काय? तर मग तुमचे पाण्याचे भांडे घ्या आणि रांगेत या, तुम्ही पुढील अलीशा, पुढील यहोशवा असू शकता!
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३