कादेश येथे लोकांनी मुक्काम केला; तेथे मिर्याम मरण पावली आणि तेथे त्यांनी तिला मूठमातीदिली. (गणना २०: १)
जेव्हा अहरोन मरण पावला तेव्हा तेथे शोक व्यक्त केला गेला होता, जेव्हा मोशे मरण पावला तेव्हा शोक व्यक्त केला होता परंतु जेव्हा मिर्याम मरण पावली तेव्हा तेथे शोक व्यक्त केला नाही, का?
मोशे आणि अहरोन यांना आश्वासित भूमीमध्ये प्रवेश करण्यापासून का रोखले गेले?
गणना 20 मध्ये मोशे ला रानात सांगितले होते की खडकाला बोल की इस्राएल लोकांसाठी पाणी बाहेर निघावे:
"आपली काठी घे आणि तूं व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा व त्यांच्यादेखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल; ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ व ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज." (गणना २०: ८)
परमेश्वराच्या लोकांवरील निराशेमुळे, मोशे ने खडकाला बोलण्याऐवजी त्यावर मारण्याचे निवडले:
परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्यासमोरून ती काठी आणिली. मोशे व अहरोन ह्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले, आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो, बंडखोरांनो, ऐका; तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढावयाचे काय?
मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारिली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले, आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. (गणना २०: ९-११)
निर्गम मध्ये प्रारंभी, परमेश्वराने मोशेला पाणी निघण्यासाठी खडकावरअवश्यमारण्यास सांगितले होते:
"पाहा, होरेबडोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन; तूं त्या खडकावर काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल; लोक ते पितील आणि इस्राएलांच्या वडिलांदेखत मोशेने तसे केले." (निर्गम १७: ६)
म्हणून निर्गम १७ मध्ये, मोशेने खडकावर मारून देवाची आज्ञा पाळली, परंतु गणना २० मध्ये खडकाला बोलण्याऐवजी त्याने खडकाला मारले आणि देवाची आज्ञा मोडली. गणना २० मधील घटनेत मोशे ने दुसऱ्यांदा काठी मारली, पहिलीवेळ निर्गम १७ मधील होती.
त्यामुळे असे म्हटले आहे की मोशेने खडकाला दोनदा मारले म्हणून त्यास शिक्षा झाली ह्या अर्थाने की गणना 20 आणि निर्गम 17 मध्ये मारणे, गणना 20 मधील दोनदा मारणे या अर्थाने नाही.
नवीन करार वचन १ करिंथ मध्ये शिकविते की रानातीलतो खडक हा परमेश्वरा द्वारे हेतू होता की त्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताचे प्रतीकात्मक असे असावे:
१ बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघांखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले
२मेघ व समुद्र ह्यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला;
३ त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले;
४ आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्यामागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते; तो खडक तर ख्रिस्त होता. (१ करिंथ १०: १-४)
निर्गम १७ मध्ये जेव्हा परमेश्वराने मोशेला खडकावर मारण्यास सांगितले होते,त्याचा हेतू होता की ख्रिस्ताला आपला उद्धारकर्ता असे चित्रित करावे. स्तोत्र आणि यशया मध्ये बायबल वारंवार सांगते कीख्रिस्त हा आपला खडक आणि कोपऱ्याचा खडक (मारला गेला) आपल्या खातर मारला गेला आहे आणि तो जिवंत पाण्याचा झरा आणेल (म्हणजे,...तारण योहान ४: १० पाहा). याहूनही अधिक, इब्रीलोकांस पत्र म्हणते कीख्रिस्त एकदाच सर्वांसाठी मरण पावला आणि येथून पुढे अर्पणाची आता गरज नाही.
म्हणूननिर्गम १७ मधील घटनेत परमेश्वराने मोशेला रानात केवळ एकदाच मारण्यास सांगितले होते, याप्रकारे, आपल्याला तारण आणण्यासाठी येशूला एकदाचबलिदान केलेले असे चित्रित करावे.
नंतर, गणना २० मध्ये, परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती की खडकाला केवळ बोलावे की निर्गम १७ मध्ये चित्रित केलेले चित्र हे तसेच ठेवावे. परंतु त्याऐवजी मोशे ने खडकाला दोनदा मारण्याचे निवडले, तेव्हानिर्गम १७ मध्ये चित्रित केलेल्या चित्राला त्याने खराब केले.
परमेश्वरानेमोशे ची चूक त्यास प्रत्युत्तर दिल्यावाचून जाऊ दिली असती, तर खराब चित्राद्वारे आपण संभ्रमात पडलो असतो,आपल्या तारणासाठी वारंवार ख्रिस्ताला (म्हणजे खडक) बलिदान (म्हणजे मारणे) करणे हे आवश्यक होते हा निष्कर्ष येतो.
त्यामुळे, परमेश्वराने मोशेला कडकइशारा दिला की खडकाच्या चित्राच्या आपल्या योग्य समजची खात्री दयावी आणि त्यास आश्वासित भूमी मध्ये प्रवेश नाकारावा. त्या प्रक्रीये मध्ये, परमेश्वराने नवीन चित्र निर्माण केले की तारणाच्या योग्य समज साठी साहाय्य करावे.
मोशे ला आश्वासित भूमी मध्ये प्रवेश नाकारून, परमेश्वराने हे स्पष्ट केले की आपण तारणा (म्हणजे आश्वासित भूमी) मध्ये नियमशास्त्राच्या कार्याने (मोशे द्वारे) नाही परंतु केवळ येशूच्या कार्याद्वारे (म्हणजेयहोशवा द्वारे, जे येशुवा किंवा येशू हे नाव आहे).
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३