तू चांदीचेदोन कर्णे बनीव; ते घडीव कामाचे असावे; मंडळीला बोलाविण्यासाठी आणि तळ उठविण्यासाठी त्यांचा तूं उपयोग करावा. (गणना १०: २)
रणशिंगाचा प्रमुख उपयोग
१. मंडळीला बोलाविणे किंवा एकत्र करण्यासाठी
२. इस्राएल चा प्रवास नियमबद्ध करावा किंवा छावणीच्या
निघण्यासाठी मार्गदर्शन दयावे
रणशिंगाचा आणखी उपयोग हे दोन्ही कर्णे वाजविलेम्हणजे सर्व मंडळीने तुझ्यासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी जमावे. एकच कर्णा वाजविलातर, सरदारांनी म्हणजे इस्राएलाच्या घराण्यांतील प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे. कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे; असाच दुसऱ्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे; कूच करावयाचे असले तर कर्ण्याचा एक मोठा गजर करावा. मंडळी एकत्र बोलवावयाची असल्यास कर्णा वाजवावा, पण मोठा गजर करू नये. (गणना१०: ३-७)
तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणाऱ्या शत्रूंशी तुम्ही लढावयास निघाल तेव्हा तुम्ही कर्ण्याचा मोठा गजर करा; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल. आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमिलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्यांच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणाचे बली अर्पण करीत असताना हे कर्णे वाजवावे; ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे. (गणना १०: ९-१०)
३. जुबिली सह अर्पणावर विशेष दिवशी वाजविणे –गणना १०: १०, लेवीय २५: ९
४. लोकांना लढाई साठी एकत्र करणे-शास्ते ३: २७
५. राजाची घोषणा करणे-२ राजे ९: १३
६. धोक्याच्या वेळी दान देणे-यहेज्केल ३२: २-६
७. जेव्हा लोक युद्धात जात असतील तेव्हा आठवण ठेवण्यासाठी –गणना १०: ९
आश्वासित देशात प्रवेश करण्यासाठी साधने
आश्वासित देशाकडे प्रवास करताना रणशिंग हे महत्वाचेसाधन होते. त्याच्याशिवाय हे फारच कठीण झाले असते की राष्ट्राला एकत्र करावे आणि आश्वासित देशाकडे निघावे. इस्राएल ला साधनाची गरज होती की आश्वासित देशाकडे जावे.
रणशिंग सह जुळलेले चमत्कार
यरीहो ची भिंत पडणे
तेव्हालोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठयाने जयघोष केला आणि तट जागच्याजागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. (यहोशवा ६: २०)
रणशिंगांच्याआवाजाने मिद्यानी लोकांच्या छावणीमध्ये संभ्रम निर्माण केला
त्याने त्या तीनशे लोकांच्या तीन तुकडया केल्या; त्या सर्वांच्या हाती त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले; त्या घड्याच्या आत दिवट्या ठेवल्या. (शास्ते ७: १६)
त्यांनी ती तीनशे रणशिंगे फुंकली तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तरवार त्याच्या सोबत्यावर व सर्व सेनेवर चालविली; तेव्हा ती सेना सरेराजवळच्या बेथ-महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली.(शास्ते ७: २२)
रणशिंग वाजविणे हे याचे उदाहरण आहे:
परमेश्वर मृत्युमधून उठवितो
१ करिंथ १५:५२ क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा; कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ.
वर उठविले जाणे
परमेश्वर रणशिंगाचा आवाज उपयोगात आणेल की त्याच्या लोकांना शेवटच्या क्षणाला एकत्र करावे-चर्च चे वर उठविले जाणे-परमेश्वराला वर आकाशात भेटणे (१ थेस्सलनी ४: १६-१८).
शुभवर्तमान घोषित करणे
स्तोत्रसंहिता ८९: १५ ज्या लोकांस उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
सेवकांचे धैर्याने आणि विश्वासाने प्रचार करणे
यशया ५८: १ कंठरव कर, कसर करू नको; आपला स्वर कर्ण्याप्रमाने मोठा कर; माझ्या लोकांस त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातके विदित कर.
नंतर होणारा न्याय
प्रकटीकरण ८: २, तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांस सात कर्णे देण्यांत आले.
परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केली होती तिला अनुसरून त्यांनी पहिले कूच केले. (गणना १०: १३)
चांदीला स्वच्छ आणि पॉलीश ठेवले पाहिजे म्हणजे ते मलीन होणार नाही. आपण सुद्धा मलीन होऊ शकतो, चांदी प्रमाणे, आपल्या भोवतालच्या ह्या जगाच्या वातावरणाने –मलीन होणे ही ह्या जगात राहत आहोत याची वास्तविकता आहे.
रणशिंगा प्रमाणे आपण सुद्धा अडथळ्यापासून मुक्त राहिले पाहिजे, जे कदाचित आपल्या स्वतःच्या गोष्टीबद्दल असू शकते जे देवाच्या आत्म्याला आपल्यात आणि आपल्याद्वारे कार्य करण्यात अडथळा करते. जेव्हा आपण आपल्या जीवनात देवाच्या आत्म्याला शरण जातो, तोआपल्याला स्वच्छ, शुद्ध आणि पॉलीश करतो; आपल्याला अत्युच्च्य स्थितीत पुनर्स्थापित करून सांभाळतो त्याच्यासाठी फुंकण्यास तयार असे ठेवतो.
रणशिंग हे श्वासा द्वारे निर्माण केलेला आवाज घेऊन जाण्याचे केवळ एक माध्यम किंवा एक साधन आहे. एक साधन, जरी आवश्यक, तरी वाजविणाऱ्या शिवाय त्याचा काहीही उपयोग नाही! श्वास/आत्मा शिवाय, रणशिंग हे शांत असते आणि काहीही आवाज करीत नाही.
ही पहिली वेळ होती जेव्हा इस्राएल एक आयोजित, तयारी केलेले राष्ट्र असे पुढे गेले. ते केवळ तोच गट नव्हता जेव्हा ते एक जमाव असे मिसर मधून सुटले होते.
मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला म्हटले की, परमेश्वराने आम्हांला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहो, तर तूं आमच्याबरोबर चल म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू; कारण इस्राएलचे कल्याण करीन असे परमेश्वर बोलला आहे. होबाब त्याला म्हणाला, मी नाही येणार;
मी आपला देश व आपले आप्त ह्यांच्याकडे जाईन. तेव्हा मोशे त्याला म्हणाला, आम्हांला सोडून जाऊ नको ना; कारण ह्या रानात कुठेकुठे तळ दयावा ह्याची तुला माहिती आहे; म्हणून तूं आमचा वाटाडी हो. (गणना १०: २९-३१)
जरी परमेश्वर तुमच्यासोबत आहे, तरीही तुम्हाला लोकांची गरज आहे की काम करावे.हे समजण्यास मोशे हा बुद्धिमान होता. ज्या दिवशी पुढारीअसा विचार करतो की तो एकटाच ते करू शकतो, तोव्यक्ति संपला आहे. ह्यानेमोशे ची नम्रता सुद्धा प्रकट केली.
मोशे जो देवाचा मनुष्य त्याची प्रार्थना
"हे परमेश्वरा उठ,
तुझ्या शत्रूंची दाणादाण होवो.
आणि तुझे द्वेष्टे तुझ्यापुढून पळून जावोत. (गणना १०: ३५)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३