एफ्राईम वंशातला नुनाचा मुलगा होशा (गणना १३: ८)
नुनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेविले. (गणना १३: १६)
यहोशवा हा एफ्राईमच्या वंशाचा होता.
परमेश्वराने भूमीची तपासणी करण्यास सांगितले
परमेश्वराने भूमीची तपासणी करण्यास का सांगितले?
मोशेनेत्यांना कनान देश हेरावयाला पाठविताना सांगितले की, येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशांत जा; आणि देश कसा आहे, देशांतील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणीवजा आहेत की तटबंदीची आहेत. तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यांत झाडेझुडपे आहेत की नाहीत हे पाहून या.
हिम्मत धरा, वा त्या देशांतली काही फळे घेऊन या. ते दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहराचे होते. (गणना १३: १७-२०)
त्यांच्यारिपोर्ट मध्ये 7 गोष्टी होत्या
१.लोक जे तेथे राहत आहेत ते सबळ आहेत की दुर्बळ आहेत.
२. थोडे किंवा पुष्कळ
३. ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे
४.त्यांच्या वस्तीची नगरे छावणीवजा आहेत की तटबंदीची आहेत
५.तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे
६. त्यांत झाडेझुडपे आहेत की नाहीत
७.त्या देशांतली काही फळे घेऊन या
लक्षात घ्या की त्या रिपोर्ट मधील एक सर्वात महत्वाची गोष्ट ही"त्या देशांतली फळे".
सर्व काही ठीक आहे –फळे महत्वाची आहेत.
भूमी ही तेथील फळांनी ओळखली जाते.
एकव्यक्ति हा त्याच्या फळांवरून ओळखला जातो. प्रभू येशूने स्वतः म्हटले: "यामुळे त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांस ओळखाल." (मत्तय ७: २०)
पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणांहून बलाढय आहेत. (गणना १३: ३१)
जर तुम्ही तुमच्या स्वाभाविक नेत्रांनीच पाहत राहिला तर तुम्ही निराश होणार हे नक्कीच. तथापि, जर तुम्ही तुमच्या आध्यात्मिक नेत्रांनी पाहता, तुम्ही शत्रूवर हसाल. आध्यात्मिक स्तरात विजय आणि पराजय हे तुमच्या आध्यात्मिक नेत्र आणि उघडे कान यावर आधारित आहे.
तुम्ही पाहता येथे अनेक लोक आहेत जे उपास करतात आणि तरीही ते परिणाम पाहत नाहीत जे त्यांनी पाहिले पाहिजे होते.
उपास आणि प्रार्थना आधारभूतपणे तुमच्या आत्म्याला तेजस्वी करते. ते देवाला बदलत नाही परंतु तुम्हाला बदलते की देवाकडून मार्गदर्शन प्राप्त करावे जे तुम्हाला मृत्युच्या मार्गावरून जीवनाच्या मार्गावर नेईल.
कारण आम्हांवर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हांसाठी अत्यंत मोठया प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करिते; आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. (२ करिंथ ४: १७-१८)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३