परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्राएल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे त्याचे नाव लिही. (गणना १७: १-२)
काठ्या ज्या पुढारी लोकांनी आणल्या त्या मृत झाल्या होत्या, त्यांच्या उगमापासून त्यास वेगळे केले गेले होते. त्यांनी निश्चितच वाढणे आणि फळ देण्याची क्षमता गमाविली होती. अहरोनाची काठी सुद्धा इतर काठ्यांमध्ये होती आणि ती सुद्धा सारख्याच परिस्थितीत होती.
परंतु परमेश्वराच्या स्पर्शाने अहरोनाची काठी अक्षरशः जिवंत झाली होती. आपण हे म्हणू शकतो की ती मृतामधून पुनरुत्थित झाली होती, प्रत्यक्षात परमेश्वर पुरुष व स्त्री जे त्याच्याकडे येतात त्यांच्यासह त्याच गोष्टी आजही करीत आहे.
हा चमत्कार येशूच्या पुनरुत्थानाकडे निर्देश करतो. हे त्या क्षणाला सुद्धा निर्देश करतो जेव्हा जे सर्व येशूख्रिस्ताला प्रभु व तारणारा असे ओळखतात त्यांस नवीन करण्यात येईल, आणि त्यांस वर उठविण्यात येईल की आकाशात भेटावे.
दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहेत, असे त्याला दिसले. (गणना १७: ८)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३