त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्याचे हाड मोडू नये. (गणना ९: १२)
१. आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे शरीर वधस्तंभावर रात्रभर तसेच ठेवण्यात आले नाही.
२. त्याचे कुठलेही हाड मोडले नाही.
जुन्या करारात वल्हांडणाचे अर्पण हेआपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानपूर्वकमरणाचेसामर्थ्यशाली आणि एक अचूक चित्रण आहे.
ज्या दिवशीनिवासमंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्यांच्यावर छाया केली; संध्याकाळी तो निवासमंडपावर अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला. (गणना ९: १५)
दिवसाच्या वेळी निवासमंडपावरमेघस्तंभ छाया करून असे. प्रत्येक जण ते डोळ्याने पाहू शकत होते.
तथापि, संध्याकाळ ते सकाळपर्यंत तेथे सर्वत्र अंधार होता. देवाचेगौरव जे निवासमंडपावर छाया करून असे ते अग्निस्तंभ प्रमाणे दिसत असे.
असा बदल का?
देवाचे गौरव मेघस्तंभ असे सतत का दिसू शकत नव्हते?
१ योहान १:५ ऐम्पलीफाईड बायबल म्हणते
परमेश्वर प्रकाश आहे, आणि त्याच्यामध्ये काहीही अंधार नाही [नाही, कोणत्याही प्रकाराने नाही].
अंधार जो सभोवती असे तो प्रकाशावर वर्चस्व करू शकत नव्हता. त्यामुळेच मी विश्वास ठेवतो की परमेश्वराने स्वतःला रात्रीच्या वेळी अग्निस्तंभ असे प्रकट केले जे प्रत्येकजण पाहू शकत असे.
तसेच, नवीन करारात, आपण देवाचे निवासमंडप आहोत. ह्या अंधाराच्या वेळी, अनेक हे ख्रिस्ती लोकांवर देवाचे गौरव स्थित असे पाहतील. ते पेंटेकॉस्टच्या दिवशी घडले, ते पुन्हा घडेल.
आत्म्या द्वारे मार्गदर्शित असे
जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्राएल लोक कूच करीत आणि तो मेघ जेथे थांबे तेथे तळ देत. (गणना ९:१७)
छावणी सोडणे आणि छावणी स्थिर करणे हे मेघस्तंभाचे निवासमंडपावर स्थिर राहणे किंवा वर उठणे यावर अवलंबून होते. हे त्यांच्या मनाच्या इच्छेनुसार नव्हते. त्यांना जेव्हा वाटेल तसे हे नव्हते. त्यांना जेथे आवडेल तेथे ते छावणी देऊन राहतील असे नव्हते. हे सर्व काही परमेश्वरा द्वारे मार्गदर्शित होते. त्यात त्यांना काही अधिकार नव्हता.
अशा प्रकारे ते परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे कूच करीत परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत; निवासमंडपावर जितके दिवस मेघ रही तितके दिवस ते तळ देऊन राहत. (गणना ९: १८)
जुन्या कराराचे चर्च हे पूर्णपणे आत्म्याद्वारे मार्गदर्शित होते-तर मग आपण नवीन कराराचे चर्च कितीतरी अधिक तसे असले पाहिजे.
कधी कधी मेघ थोडेच दिवस निवासमंडपावर असे, तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तसेच तळ देऊन राहत आणि पुन्हा परमेश्वराची आज्ञा झाली म्हणजे कूच करीत.(गणना ९: २०)
आत्म्याद्वारे मार्गदर्शित असणे हे आरामदायक नाही. ते तुम्हाला अनेक वेळेला कष्टदायककरेल. ते तुम्हाला तुमच्या आरामाच्या कक्षेतून बाहेर काढेल. जेव्हा तुम्ही विचार कराल की तुम्ही आता आरामाच्या स्थितीत जात आहात तो तुम्हाला तेथून हालवेल, किंवा तुम्हाला काहीतरी करावयास लावेल जे तुमच्या शारीरिकतेला आरामदायक असे असणार नाही.
कधी कधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी तो हालला म्हणजे ते कूच करीत; दिवसा किंवा रात्री केव्हाही मेघ वरती गेला की ते कूच करीत. (गणना ९: २१)
कल्पना करा छावणी रात्रीच्या वेळी निघत आहे.
लेकरे आणि वृद्धजन झोपलेले आहेत आणि अचानक तेथे जाण्याची आज्ञा आहे.
जितके परमेश्वराच्या आत्म्याद्वारे चालविले जातात, तितके देवाचे पुत्र आहेत. (रोम८: १४)
पवित्र आत्मा जो व्यक्तीच्या जीवनात आहे त्याने त्यास परमेश्वराच्या योजनाआणि उद्धेशा मध्ये मार्गदर्शित करावे.
लक्षात घ्या, ते जे परमेश्वराच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित आहेत, त्यांनाच देवाची मुले म्हटले आहे. आज सुद्धा अग्निस्तंभ आणि मेघ स्तंभाला तुम्हाला मार्गदर्शन करावयाचे आहे.
१. देवाच्या वचनावर मनन करा
"नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर; म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ति घडेल. (यहोशावा १: ८)
जेव्हा तुम्ही देवाच्या वचनावर मनन करता, तुम्ही तुमच्या मानवी आत्म्याला प्रशिक्षण देत आहात की देवाची वाणी ओळखावी आणि त्यास तुम्हाला काय सांगावयाचे आहे त्याबाबत अधिक लयबद्ध व्हावे, विशेषतः-प्रत्येक परिस्थितीच्या सर्व सव्विस्तर वर्णना विषयी. त्यामुळेच देवाने यहोशवाला म्हटले की देवाच्या वचनावर मनन करणे हे संपन्नता आणि यशाची किल्ली आहे (यहोशवा १: ८). त्याने त्यास एक गुपित दिले की सर्व काही प्राप्त करावे जे त्यास प्राप्त करावयास पाहिजे होते.
२. देवाचे वचन पाळणारे व्हा.
"देवाचेवचनपाळणारे व्हा, केवळ ऐकणारे नाही." (याकोब १: २२)
देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित व्हावे याचा एक सर्वात खात्रीशीर मार्ग हा की देवाचे वचन पाळणारे व्हावे. सध्याच्या दिवसात आपण अनेक ख्रिस्ती लोकांना देवाचे वचन पाळताना पाहत नाही. ते निश्चितच बोलतात आणि बोलत राहतात, परंतु त्यांचे जीवन जगातील इतरांसारखेच दिसते.
देवाचे वचन पाळणारे होण्यासाठी, तुमच्याहृदयात निश्चित करा की जे काही त्यात लिहिले आहे ते तुम्ही पाळावे. याचा अर्थ तुम्ही तुमचे जीवन बदलता की देवाचे वचन त्यात योग्य असे स्थित व्हावे याऐवजी की देवाच्या वचनास तुमच्या जीवनशैली मध्ये स्थित करावे. तुम्हीबहाने करीत नाही; तुम्ही हे बदलण्याचा प्रयत्न करीत नाही की बायबल प्रत्यक्षात कायम्हणत आहे की तुमच्या शारीरिकतेच्या इच्छेनुरूप तसे करावे. तुम्ही केवळ वचन विश्वासा द्वारे पाळता.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३