मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही;
त्याला न्याहाळीन पण तो जवळ नाही;
याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि
इस्राएलातून एक राजदंड निघेल,
तो मवाबाचा कपाळमोक्ष करील,
सर्व बंडखोरांना चीत करील. (गणना २४: १७)
येणाऱ्या मशीहा विषयी हा उतारा एक सुंदर भविष्यवाणी आहे.बलाम त्यास पाहू शकत होता, पण आता नाही. प्रभु येशूला येथे भविष्यात्मक तारा आणि राजदंड असे म्हटले आहे;
तो एका ताऱ्याप्रमाणे तेजस्वी आहे, आणि त्यास सर्व अधिकार आहे की राज्य करावे, जसे राजदंड द्वारे चित्रित केले आहे.
मग बलाम उठलाआणि घरी निघून गेला, आणि बालाक सुद्धा त्याच्या मार्गाने गेला. (गणना २४: २५)
मग बलाम उठलाआणि घरी निघून गेला
याचे भाषांतर असे करू नये की ज्याचा अर्थ असा नाही की तो ताबडतोब पथोर(त्याचे स्वतःचे शहर)ला गेला, कारणबलाम हा त्यांच्यामध्ये होता जेव्हा इस्राएली लोकांनी मिद्यानी लोकांचा वध केला. (गणना ३१: ८)
"घर' शक्यतो ते स्थान होते जेथे तो राहत होता जेव्हा तो बालाक ला भेटण्यास गेला होता.
बालाक सुद्धा त्याच्या मार्गावर गेला
आपण बालाक ला एका गोष्टीसाठी श्रेय दिले पाहिजे, त्याने इस्राएल ला सेने द्वारे किंवा नवीन योजने द्वारे पराभूत करण्याचे पाहिले नाही. त्यास ठाऊक होते की हे आध्यात्मिक युद्ध होते आणि जो हे युद्ध जिंकेल तो भौतिक युद्ध सुद्धा जिंकेल.
प्रेषित पौल ह्या सत्याविषयी अवगत होता आणि त्याने लिहिले:
कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे [केवळ शारीरिक विरोधकांबरोबर लढा नाही], तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर [प्रभुत्व करणाऱ्या आत्म्यांबरोबर], आकाशातल्या[स्वर्गीय]दुरात्म्यांबरोबर आहे. (इफिस ६:१२)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३