डोंगरमाथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत,
टेकडयावरून मी त्यांना पाहात आहे;
पाहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे.
ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणीत नाही. (गणना २३: ९)
हे भविष्यात्मक वचन स्पष्टपणे उल्लेख करते की इस्राएल हे इतर राष्ट्रांपेक्षा वेगळे असेन.
इस्राएल ची मोठी परीक्षा ही त्यांना इतर राष्ट्रांप्रमाणे असावे असे पाहिजे होते, आणि ह्यामुळेच त्यांना त्यांचे पतन आणि बंदिवासात नेले. खऱ्या आणि जिवंत परमेश्वराचे एकमेव लोक असा आनंद करण्याऐवजी, त्यांनी त्याची उपासना आणि आचरणात त्यांच्या शेजारी राष्ट्रांसारखे केले आणि परमेश्वराला त्यांना शिस्तीत आणावे लागले.
परमेश्वर हा राजा असे त्यांवर राज्य करू देण्याऐवजी,त्यांनी"इतर राष्ट्रांप्रमाणे" राजाची मागणी केली (१ शमुवेल ८: ५), आणि ह्याने राष्ट्राला सर्व प्रकारच्या संकटात आणले.
नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो! (गणना २३: १०)
बलाम हा अनेकांमध्ये एक होता जो नीतिमानाप्रमाणे मृत्यू यावा याची इच्छा करीत होता आणि तरीही नीतिमानाप्रमाणे जगावे अशी इच्छा ठेवीत नव्हता.
त्याचे पैशावरील प्रेमाने त्याच्या जीवनास इतके नियंत्रणात ठेवले होते कीसंपत्ति मिळविण्यासाठी तो काहीही करण्यास तयार होता. बलाम हा दुष्टांबरोबर मरण पावला जेव्हा इस्राएली लोकांनी मिद्यानी लोकांना पराभूत केले (३१: ८), आणि त्याचा शेवट हा सार्वकालिक न्याय होता.
बालाका, ऊठ, एकूण घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे.
देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी;
तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा;
दिलेले वचन तो पाळणार नाही काय?
दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?(गणना २३: १९)
पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते, "देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी". जर आपल्याला त्याची नक्कल करावयाची आहे, जसे इफिस ५: १ मध्ये स्पष्ट केले आहे, तर मग आपण सुद्धा आपले वचन पाळले पाहिजे!
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३