इस्राएल लोक शिट्टीमात राहत असता तें मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले. त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञांस बोलावू लागल्या; तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. अशा प्रकारे इस्राएल लोक बआलपौराच्या भजनी लागले, म्हणूनपरमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. (गणना २५: १-३)
बलाम ने इस्राएल ला शाप देण्याचा प्रयत्न केला आणि देऊ शकला नाही; परंतु आता ते परमेश्वराच्या विरोधात केलेल्या पापांमुळे शापित झाले.
हिंदी भाषेत येथे एक प्रसिद्ध म्हण आहे, जी अशी आहे, "तुमच्या स्वतःच्या पायावरतुमच्याच कुऱ्हाडीने मारू नका." शत्रू जे इस्राएल लोकांविरुद्ध पूर्ण करू शकला नाही, इस्राएल लोकांनी त्यांच्या अवज्ञेमुळे त्यांच्या स्वतःवर ते आणले. आज सुद्धा तोच सिद्धांत हा देवाच्या लोकांविरुद्ध आहे. सैतानाचे आपल्या विरुद्ध मोठे आक्रमण हे आपल्याविरुद्ध इतका विनाश करू शकत नाही जितके देवा विरुद्ध आपली स्वतःची पापे आणि अवज्ञा करू शकते.
बलामाने इस्राएल ला शाप देण्याचा सर्वोतोतरी प्रयत्न केला- परंतु यशस्वी झाला नाही. तरीसुद्धा पैशा वरील त्याच्या प्रेमामुळे ज्या मनुष्याने, बालाक, मवाबाचा राजा, त्यास बोलावून आणले होते, त्यास प्रसन्न केल्याशिवाय विषयाला संपवू दिले नाही.
परमेश्वराने स्वतः ते उघड केले जे बलाम ने इस्राएलीलोकांना केले होते, हे म्हणत: "तथापि तुला थोडया गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, 'बलामाच्या' शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने'मूर्तीला दाखविलेला नैवद्य खाणे व जारकर्म करणे,' हेअडखळण'इस्राएलाच्या संतानापुढे' ठेवण्यास बालाकाला शिकविले." (प्रकटीकरण २: १४)
मुख्यतः इस्राएल ला शाप देण्यात अपयशी ठरल्या नंतर, बलामने बालाक ला म्हटले: "मी ह्या लोकांना शाप देऊ शकत नाही. परंतु तू त्यांना त्यांच्या परमेश्वरा विरुद्ध बंड करावयास स्त्रीयांद्वारे प्रलोभनात टाकून त्यांनास्वतःला शापित करावयास लाव. तुमच्या सुंदर मुली त्यांच्यामध्ये पाठवा आणि त्यांना सांगा की इस्राएली लोकांना अनैतिकता आणि मूर्तीपूजे कडे वळवा." आणि त्याने कार्य केले.
बलाम, नेबालाक ला त्याच्या दुष्ट सल्ल्या द्वारे, त्यास जे पाहिजे होते ते केले-परंतु देवाच्या शत्रुंसोबत त्याचाशेवटी मृत्यू झाला (गणना ३१: ७-८). त्यानेत्याच्या पैशाचे सुख फार कमी वेळ भोगले.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३