मी मिसऱ्यांचे काय केले ते व तुम्हांला गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणिले आहे हे तुम्ही पाहिले आहे. (निर्गम १९:४)
असे म्हटले जाते की गरुड इतर पक्षांप्रमाणे त्याच्या पिल्लांना पंजा मध्ये घेऊन उडत नाही; लहान पिल्ले आईच्या पाठीवर घट्ट आवळून राहतात आणि जेव्हा त्यांना घेऊन जातात तेव्हा त्यांचे संरक्षण होते. एखादया शिकारीच्या बाणा ने लहान पिल्लांना स्पर्श करण्याअगोदर त्यास आईच्या शरीरातून प्रथम गेले पाहिजे. हे प्रीति व संरक्षण विषयी बोलते.
परमेश्वराने इस्राएलला मुक्त केले नाही की त्यांनी परमेश्वरापासून स्वतंत्र असे जगावे, परंतु ते देवाचे लोक म्हटले जावे व त्याच्याबरोबर त्यांची संगती असावी.
पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. (निर्गम १९:६)
प्रेषित पेत्र आपल्याला याची आठवण देतो की आपण राजकीय याजकगण आहोत (१ पेत्र २:९), ते जे देवाची राजे व याजक असे दोन्ही प्रकारे सेवा करतात (आणि त्याचा परमेश्वर व पित्याचे राजे व याजक असे केले आहे, प्रकटीकरण १:६).
शिंगांचा आवाज अधिकच वाढू लागला तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. (निर्गम १९:१९)
प्रकटीकरणात्मक व काही वेळेला पवित्र शास्त्राच्या इतर रूपकात, कर्ण्याची वाणी असणे असे वर्णन केले आहे. योहानाने, "तीन देवदूतांच्या कर्ण्याच्या इतर वाणी" विषयी बोलले आहे (प्रकटीकरण ८:१३). "देवाचा कर्णा" हा प्रत्यक्षात देवाच्या ऐकू येणाऱ्या वाणीचे प्रकटीकरण असू शकतो काय?
प्रेषित पौलाने हे कधीही स्पष्ट केले नाही की "देवाचा कर्णा" हा प्रत्यक्षात काय आहे, मग तो अक्षरशः कर्णा आहे किंवा देवाच्या वाणी साठी रूपक आहे. तोरह मध्ये, जेव्हा मोशे सीनाय पर्वतावर होता आणि देव बोलला, त्याचा आवाज हा कर्णा सारखा वर्णन केले आहे.
निर्गम १९:१९ मध्ये लक्षात घ्या, जेव्हा परमेश्वर सीनाय पर्वतावर येतो व मोशे वर जातो, तेथे "शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला."
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०