मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तूं व जे लोक तूं मिसर देशांतूनआणिले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा; व जो देश तुझ्या संततीला देईन अस अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना मी शपथपूर्वक सांगितले होते, त्या देशाकडे जा; मी तुझ्यापुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांना तेथून घालवून देईन; दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तूं जा; तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही; आलो तर वाटेतच मी तुम्हांला भस्म करीन. (निर्गम ३३: १-३)
परमेश्वराच्या शब्दाकडे लक्ष दया, "तूं व जे लोक तूं मिसर देशांतूनआणिले आहेत". हे स्पष्ट आहे की परमेश्वर इस्राएलच्या आचरणामुळे दु:खी झाला होता.
सोन्याच्या वासराच्या पापा नंतर, परमेश्वराने इस्राएली लोकांना आश्वासित भूमी नाकारली नाही. त्याने सांगितले त्याने जे त्यांस आणि अब्राहाम, इसहाक व याकोबास आश्वासन दिले आहे ते प्राप्त करतील.
सोन्याच्या वासराच्या पापा नंतर, परमेश्वराने इस्राएली लोकांना संरक्षण देण्याचे नाकारले नाही. त्याने आश्वासन दिले की तो कोणत्यातरी प्रकारे त्यांच्याबरोबर राहील(मी माझा दूत पाठवीन) आणि त्याने आश्वासित भूमी मध्ये त्यांच्यासाठी लढा दयावा. तथापि, परमेश्वराने हे अवश्य म्हटले, तो इस्राएली लोकांना त्याच्या उपस्थिती पासून दूर करेल. हे तसे म्हणण्यासारखे आहे की परमेश्वर म्हणत आहे तुम्हांला आशीर्वाद प्राप्त होवो परंतु मी त्याचा हिस्सा असणार नाही.
"ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखून ने ठेवता त्याला आपणांसर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही?" (रोम ८: ३२)
सर्वगोष्टी- त्याच्याबरोबर
सर्व गोष्टीत्याच्याशिवाय (त्याच्या उपस्थिती शिवाय) हे अर्थहीन आहे
खरी पवित्र शास्त्राची संपन्नता ही त्याच्यासह आहे
परमेश्वर मोशेला म्हणाला, तूं इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही ताठ मानेचे लोक आहा; मी पळभर तुमच्याबरोबर असलो तरी मी तुम्हांला भस्म करीन; म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरून ठेवा, म्हणजे तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन. (निर्गम ३३: ५)
हे असे नव्हते की परमेश्वर दागदागिन्या विरुद्ध होता परंतु आशीर्वादाचा गैरवापर केला गेला की तो शाप व्हावा. इस्राएल लोकांनी दागदागिने (ते जे देवाने त्यांन दिले होते) मूर्ती-सोन्याचे वासरू बनविण्यासाठी वापरले होते.
मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्याला तो दर्शनमंडप म्हणे. कोणाला परमेश्वरापाशी काही विचारावयाचे असले म्हणजे तो छावणीबाहेरील त्या दर्शनमंडपाकडे जाई. असे होई की, जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जाई तेव्हा सर्व लोक उठून आपआपल्या तंबूच्या दारांत उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण कारी.
त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपआपल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालीत. मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. (निर्गम ३३: ७-११)
प्रत्येकाने पाहिले की हा मेघस्तंभ मोशेच्या तंबू कडे येत असे, आणि त्यांना ठाऊक होते की मोशे तेथे उपासना करी आणि परमेश्वराशी तेथे भेटत असे. हे लोकांसाठी मोठे समाधान होते, की त्यांचा पुढारी हा खरेच परमेश्वराबरोबर भेटत आहे आणि त्याच्याकडून ऐकत आहे.
आणि सर्व लोक उठून उभे राहत आणि दंडवत घालीत: हे त्यांचे स्वाभाविक प्रत्युत्तर होते. मोशे आणि त्याचे परमेश्वराबरोबर संबंध याविषयी काहीतरी ज्याने इतरांना सुद्धा परमेश्वराची उपासना करावी असे केले.
मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले: गणना १२: ८ हे स्पष्ट करते की याचा अर्थ काय आहे. परमेश्वर जसे इतर संदेष्ट्यांशी बोलत असे त्याउलट तो मोशे बरोबर बोलत असे; मोशे स्पष्टपणे आणि समोरासमोर ऐकत असे, आणि इतर संदेष्ट्ये हे स्वप्नात आणि दृष्टांतात पाहत होते.
हे शक्य आहेकीपरमेश्वरमोशे समोर मानवी रुपात प्रकट झाला असेन, जसे त्यानेउत्पत्ति १८ मध्ये अब्राहामा बरोबर केले. अधिकतर हे समजले तर, समोरासमोर हे वाक्य हे सरळपणे प्रतीकात्मक व्यक्त करणे आहे, याचा अर्थ मुक्त आणि उघड संगती.
मोशे ने परमेश्वर पित्याचे त्याच्या गौरवामध्ये प्रत्यक्ष स्वरूप हे पाहिले नसेल-पाहू शकला नसेल. पित्याचेमुख त्याच्या गौरवात हे कोणीही पाहिलेले नाही, आणि म्हणूनच योहानाने लिहिले, परमेश्वराला कोणीही कधीही पाहिलेले नाही (१ योहान४: १२).
जुन्या करारात कोणीही त्याच्या गौरवातत्यास पाहून जगू शकत नव्हता परंतु नवीन करारात तुम्ही त्याचे गौरव पाहू शकता.
शब्द देही झाला, आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.
(योहान १: १४)
मोशे परमेश्वराला म्हणाला, तूं स्वतः येत नसलास तर आम्हांला येथून पुढे नेऊ नको. (निर्गम ३३: १५)
मोशे त्याच्या उपस्थिती शिवाय तेथे जाण्यास तयार नव्हता. त्याचा उद्देश हा तेथे जाणे हा नव्हता तर त्याची उपस्थिती होती.
तुझी कृपादृष्टि माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तूं आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजानन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहो ह्यावरूनच ते समजावयाचे ना? (निर्गम ३३: १६)
वचन १६ काही महत्वाचे गुपित प्रकट करते
तुझी कृपादृष्टि माझ्यावर (मोशे) व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे?
उत्तर: देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आणि आपल्याबरोबर हे दाखवेल (जे आपल्या सभोवती आहेत त्यांना प्रकट करेल) की त्याच्या लोकांनी त्याच्या दृष्टीत कृपा प्राप्त केली आहे.
कृपा हे केवळ काही सिद्धांत नाही.
एकव्यक्ति ज्याने देवाच्या दृष्टीसमोर कृपा प्राप्त केली आहे तोदेवाच्या उपस्थितीला इतक्या आवेशाने घेऊन चालेल की तो किंवा ती हे जसे जीवन जगत आहे त्याद्वारे इतर हे ओळखतील.
तुझे लोक आणि मी वेगळे असेन
देवाची उपस्थिती ही आपल्याला जगापासून वेगळे करते.
जगाचे लोक त्यांचे दैवत त्यांच्या भोवती घेऊन चालतात. त्याची उपस्थिती आपल्याला घेऊन चालते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०