धुपवेदी
निर्गम ३०: १-१०
जेव्हा अहरोन धूप जाळत असे तेव्हा संपूर्ण परिसर हा सुगंधाने भरून जात असे. हा सुगंध पवित्र स्थानाच्याही पलीकडे जात असे, निवासमंडपात आणि निवासमंडपाच्या दरवाजा बाहेर. यहूदी रूढीपरंपरे नुसार,धुपाचा सुगंध हा मंदिरापासून मैलाच्या अंतरापर्यंत जाणवला जात असे, येशू पृथ्वीवरअसताना.
क्युबीट हे कोहिनीचे टोक आणि निर्देशक बोटाचे टोक यामधील अंतर इतके आहे-जवळजवळ 18 इंच.
शिंगे ही सामर्थ्य आणि शक्तीचे चिन्हात्मक आहे.
चार शिंगे, जे काही ह्या वेदीवर घडत आहे तेचाऱ्ही दिशांना पोहचते
धुपवेदी ला फक्त दोन रिंग होते होमार्पणाच्या वेदी च्या चार रिंग च्या तुलनेत
दांडे हे मुख्यतः केवळ वाहून नेण्यासाठी होते.
मुख्य याजकाच्या घराब झालेल्या किंवा फाटलेल्या वस्त्रामधून वाती ह्या बनविल्या जात होत्या. ते टाकून देत नसत. ते पवित्र आणि देवाच्या पवित्र उद्देशाकरिता वेगळे केले गेले होते. ते लहान पट्ट्या असे फाडले जात होते आणि वाती म्हणून वापरले जात होते.
बायबल म्हणते, "तो पलिष्टी (गल्याथ) चाळीस दिवस-पर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे. (१ शमुवेल १७: १६)
तुम्हांला ठाऊक आहे काय की गल्याथ ने इस्राएली लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जेव्हा सकाळचे व संध्याकाळचे अर्पण हे दिले जात होते? सरळ शब्दात म्हटले तर, हा अडथळा प्रार्थनेच्या वेळेमध्ये होता.
"अहरोनाने वर्षांतून एकदा तिच्या शिंगांसाठी प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे; ही वेदी परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र होय." (निर्गम ३०: १०)
धुपवेदी ही प्रार्थनेची वेदी होती. प्रत्येक वर्षी तिला शुद्ध, पवित्र केले जात असे.
हे प्रायश्चित्ताच्या दिवशी केले जात असे.
तुम्हांला तुमच्या प्रार्थनेच्या वेदीला नित्य शुद्ध करण्याची गरज आहे.
अभिषेकाचे तेल
निर्गम ३०: २२-३२
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०