परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.
दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवासमंडपाची उभारणी झाली. (निर्गम ४०: १-२, १७)
मनोरंजक वास्तविकता ही आहे की निवासमंडप हा नवीन वर्षी स्थापित केला गेला.
अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला आणि त्यांतल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल. (निर्गम ४०:९)
घराचा अभिषेक हा वचनात आहे.
ह्या अध्यायात ९ वेळा "परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे" हा वाक्प्रचार वारंवार आला आहे.
हे मग तेव्हाच जेव्हा तुम्ही तसे करता जशी परमेश्वराने आज्ञा केली आहे तेव्हाच मग परमेश्वराचे तेज तुमच्या जीवनात भरून जाईल जसे त्याने निवासमंडपाला भरले होते.
परमेश्वराचे तेज
परमेश्वराचे तेज हे केवळ उचंबळून येणे किंवा काही भावना नाही. ही काही घटना नाही की एखाद्या विशेष प्रसंगासाठी आयोजिली आहे. शब्द तेज हे अक्षरशः "मोठाभार" असे भाषांतरित केले आहे.
मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शनमंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आंत प्रवेश करिता येईना. (निर्गम ४०:३४-३५)
लक्षात घ्या की मोशे ने निवासमंडपात परमेश्वराचे तेज भरण्यासाठी प्रार्थना देखील केली नव्हती. जेव्हा गोष्टी ज्या पर्वतावर दाखविल्या गेल्या आहेत त्यानुसार केल्या गेल्या, जेव्हा गोष्टी ह्या परमेश्वराच्या इच्छेनुसार केल्या गेल्या परमेश्वराचे तेज हे अक्षरशः चिटकून राहील किंवा एखादा प्रकल्प, सेवाकार्य, व्यक्तीच्या मागे राहील.
इस्राएल लोकांच्या एकंदर प्रवासांत निवासमंडपावरील मेघ वर जाई तेव्हा ते कूच करीत; आणि तो मेघ वर गेला नाही तर ते कूच करीत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यांत अग्नि असे; हे असे एकंदर प्रवासांत सर्व इस्राएल घराण्याच्या दृष्टीस पडत असे. (निर्गम ४०:३६-३८)
जुन्या कराराचे चर्च हे देवाच्या आत्म्या द्वारे मार्गदर्शित होते तर नवीन करारातील चर्च ला किती अधिक असावे लागेल. रोम ८:१४ म्हणते, "जितक्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो तितके देवाची मुले आहेत."
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०