आपणांविरुद्ध बंद करणाऱ्यांना तूं आपल्या महाप्रतापाने उलथून टाकीतोस; तूं आपला संताप भडकवितोस, तो त्यांना भूसाप्रमाणे भस्म करितो. (निर्गम १५: ७)
हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकीतो. (निर्गम १५: ६)
प्रार्थना: पित्या, तुझ्यावैभवाच्या महानतेने जे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या सेवाकार्याच्या विरोधात उभे राहत आहेत त्यांना उलथून टाक. तुझ्या क्रोध त्यांच्यावर पाठीव; त्याने त्यांस भूसाप्रमाणे भस्म करावे. येशूच्या नांवात.
शत्रू म्हणाला,
मी पाठलाग करीन, मी गाठीन,
मी लूट वाटून घेईन;
त्यामुळे माझा जीव तृप्त होईल;
मी तरवार उपसून आपल्या हाताने
त्यांचा नाश करीन. (निर्गम १५: ९)
शत्रू काय म्हणत आहे?
शत्रूने म्हटले आहे:
१. मी पाठलाग करेन
२. मी गाठीन
३. मीलूट वाटून घेईन
४. त्यामुळे माझा जीव तृप्त होईल
५. मी तरवार उपसून आपल्या हाताने
६. त्यांचा नाश करीन.
स्तुती
हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे?
पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक
अद्भुते करणारा, अस जो तूं
त्या तुझ्यासारखा कोण आहे? (निर्गम १५: ११)
नंतर मोशेने इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानांत जाऊन पोहचले; त्या रानांतून तीन दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कोठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले; तेथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. (निर्गम १५: २२-२४)
येथे आपण पाहतो लोक कुरुकुर आणि तक्रार करीत आहेत. फक्त तीन दिवसांपूर्वी त्यांनीपाहिले होते की परमेश्वराने त्यांच्यासाठी तांबडया समुद्राला उघडले होते. ते तांबडया समुद्रातून कोरडया भूमीतून चालले होते. त्यांचे शत्रू, मिसरी लोक त्याच तांबडया समुद्रात नष्ट झाले होते. ते परमेश्वरासमोर डफ घेऊन नाचले होते आणि आता ते कुरकुर करीत आहेत-केवळ तीनच दिवसात काय हा बदल.
मनुष्याच्याअस्थिर स्वभावाला हे दाखविते. देवाच्या चांगुलपणाला मनुष्य किती लवकर विसरतो. देवाने मागे मनुष्याच्या जीवनात किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत ते किती लवकर तो विसरतो. येथे आपल्यापैंकी काही आहेत, आपण जिवंत राहिलो नसतो जर प्रभूने कार्य केले नसते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०