परमेश्वर मोशेला म्हणाला, तूं लोकांच्या पुढे जा, इस्राएलांतील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तूं नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल. पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन; तूं त्या खडकावर काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल; लोक ते पितील आणि इस्राएलांच्या वडिलांदेखात मोशेने तसे केले. (निर्गम १७:५-६)
वरील वचनांत, परमेश्वराने मोशे ला म्हटले की खडकावर काठी आपट म्हणजे त्यातून पाणी वाहेल की इस्राएली लोकांची तहान भागवावी. हे ख्रिस्ताच्या वधस्तंभी जाण्याचा निर्देश देते आणि हे आपल्याला हे सुद्धा दाखविते की ख्रिस्त हा आपल्या सर्व गरजांची पूर्तता करणारा आहे. पाणी जे खडकातून वाहते ज्याला मारले गेले ते हे चिन्हित करते की आपल्याला जीवनात याची गरज आहे, मग ते आरोग्य, उत्तम नातेसंबंध, एक नवीन नोकरी ....काहीही असो, ज्या कशाचाही आपल्याला गरज आहे ते येशू जो खडक त्याकडून वाहते.
आपल्याला हे कसे कळते की येशू हा खडकास प्रतिनिधित करतो? १ करिंथ १०:४ मध्ये, प्रेषित पौल आपल्याला सांगतो की तो खडक हा ख्रिस्त होता.
मग अमालेक येऊन रफीदिम येथे इस्राएल लोकांशी लढू लागले. (निर्गम १७:८)
इस्राएली लोक हे परमेश्वराच्या इच्छे मध्ये होते. परमेश्वर स्वतः त्यांना मार्गदर्शन करीत होता. मग त्यांच्यावर आक्रमण का झाले! परमेश्वराच्या मागे चालणे याचा अर्थ हा नाही की तुम्ही आक्रमण पासून मुक्त आहात, परंतु तुम्ही पराजय पासून मुक्त आहात.
तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, आपल्यांतले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकांशी युद्ध कर; उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. (निर्गम १७:९)
मध्यस्थी ही आणखी एक किल्ली आहे की चमत्कार पाहावे. गट सेवा. यहोशवा लढत आहे-मोशे मध्यस्थी करीत आहे- अहरोन आणि हूर सेवाकार्यास साहाय्य करीत आहेत.
लक्षात घ्या यहोशवा हा सुद्धा एक मनुष्य होता ज्यास हे ठाऊक होते की परमेश्वराच्या सान्निध्यात असणे म्हणजे काय आहे. तो सान्निध्याचा मनुष्य होता.
तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नांव याव्हे-निस्सी (म्हणजे परमेश्वर माझा झेंडा) असे ठेविले. (निर्गम १७:१५)
जुन्या करारात, याव्हे (वायएचवीएच) नावाचे सोळा संयुक्त नांवे आहेत. येथे आपण पाहतो कि, मोशे, देवाचा माणूस ज्याने देवाच्या वेदी ला यहोवा-निस्सी म्हटले आहे. झेंडा शब्द साठी 'निस्सी" हा इब्री शब्द आहे. हे त्या परमेश्वराबरोबर ओळख दाखविते जो आपले युद्ध लढतो.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०