लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते, म्हणून त्याने त्यांना आशीर्वाद दिला. (निर्गम ३९: ४३)
प्रतिनिधित्व आणि निरीक्षण हे बरोबर कार्य करते
प्रतिनिधित्व निरीक्षणा शिवाय हे विनाश आहे
मोशेने कार्य सोपविले परंतु कार्याचे निरीक्षण सुद्धा केले.
मग त्याने ते कार्य समाधानी आहे असे पाहिले आणि त्यांना आशीर्वाद दिला.
नवीन निरीक्षकास आणि व्यवस्थापकास प्रतिनिधित्व करणे हे नेहमी कठीण जाते
अनेक व्यवस्थापकास तेच निर्णय जे त्यांनी नेहमीच घेतले आहेत ते घेऊन आरामात राहावे असे वाटते. ते विश्वास ठेवतात की ते स्वतःच ते कार्य उत्तमरीत्या करू शकतात.
त्यांनापरिस्थिती किंवा त्याचा परिणाम हाताबाहेर जाऊ नये म्हणून धोका पत्करणे नको वाटते. नेहमी, अपयशाच्या कारणामुळे त्यांना त्यांच्या अधीन असणाऱ्या व्यक्तींना जबाबदारी देण्याचा धोका पत्करणे नको वाटते.
हा झगा सेवा करतेवेळी घालण्यासाठी होता. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. (निर्गम ३९: २६)
वरील वचन याजकाने पवित्र स्थानात तो सेवा करताना घातलेल्या वस्त्रा (झगा) बद्दलवर्णन करते. त्या झग्याला घुंगरू व डाळिंब होते, घुंगरू आणि डाळिंब हे झग्याच्याघेरात सभोवती होते. येथे यास गहन आध्यात्मिक महत्त्व आहे.
मुख्य याजकाच्या झग्याच्या सोग्यावर डाळिंब हे आत्म्याचे फळ असेचिन्हात्मक आहे.
मुख्य याजकाच्या झग्याच्या सोग्यावर घुंगरू हे आत्म्याच्या दानाचे चिन्हात्मक असे आहे.
घुगारूंचा आवाज हा बाहेर थांबलेल्या व्यक्तींना दर्शवितो की याजक हा परमेश्वराच्या उपस्थितीत जिवंत आहे आणि मरून गेलेला नाही.
सर्वात महत्वाचे सत्य येथे हे आहे कीआपण एक घ्यावे आणि इतर घेऊ नये असे करू शकत नाही. आपण एकाची जोपासना करावी आणि दुसरे नाकारावे असे करू शकत नाही. ते घुंगरू, डाळिंब, घुंगरू, डाळिंब असेच आपल्या जीवनाच्या सभोवती असले पाहिजे.
आपले जीवन, आपली सेवा, जे काही आपण करू त्यात वरदानआणि फळे यांचे सिद्ध संतुलन असले पाहिजे; दोन्ही हे तेथे परमेश्वराला आणि त्याच्या लोकांना आशीर्वादित करण्यासाठी आहे. असे होवो हे सदैव असेच राहो.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०