मिसर ला दास्यगृह असे म्हटले आहे (निर्गम १३: ३).
जेव्हा फारोने लोकांस जाऊ दिले तेव्हा पालिष्टी लोकांच्या देशांची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिसराकडे परत जातील असे देवाला वाटले. (निर्गम १३: १७)
तुम्ही जे पाहता आणि ऐकता ते तुमचे उद्देश बदलू शकते
म्हणून हे महत्वाचे आहे की योग्य गोष्टी पाहाव्या आणि ऐकाव्या. योग्य गोष्टी पाहणे आणि ऐकणे हे तुमच्या उद्देशाला बळकटी आणू शकते. केवळ त्याच गोष्टी पाहा आणि ऐका ज्या तुमच्या उद्देशासाठी लाभदायक अशा आहेत.
सात दिवस बेखमीर भाकऱ्या खाव्या आणि सातव्या दिवशी परमेश्वरासाठी सण पाळावा. ह्या सात दिवसांत बेखमीर भाकर खावी; खमिराची भाकर तुझ्याजवळ दिसता कामा नये, तुझ्या देशभर खमीर दिसूही नये. (निर्गम १३: ६-७)
बेखमीर भाकरीचा सण हा पाळावा जरी इस्राएल लोक हे मिसर मधून बाहेर आले होते आणि ते कनान मध्ये प्रवेश करीत होते. हा पावित्रीकरणाचा प्रकार होता. मी विश्वास ठेवतो कीव्यक्ति जेव्हा येशू ख्रिस्ताला त्याचा किंवा तीचा प्रभु आणि तारणारा असे स्वीकारतात, तेव्हा त्यांनी सात दिवसांचा उपास करावा. पौल जो प्रेषित त्याने सुद्धा उपास केला जेव्हा जिवंत ख्रिस्ताबरोबर त्याची भेट झाली होती.
खमीर हे पाप चे चिन्हात्मक रूप आहे.
जुन्या करारात अनेक गोष्टी ह्या येशू कडे जसेबोट दाखवितात,"बेखमीर भाकरी" सुद्धा तसेच करते. नवीन करारात, येशू स्वतःला "जीवनाची भाकर" असे संबोधित आहे (योहान६: २२-५९). तो अर्थातच, निष्पाप होता, (१ योहान ३:५, २ करिंथ ५: २१, इब्री ४: १५, १ पेत्र २: २२). कारण संपूर्ण बायबल मध्ये खमीर हे पाप समान म्हटले गेले आहे, "बेखमीर भाकर" ही चित्रित केली आहे की भाकर (येशू)ज्यात खमीर (पाप) नाही.
इस्राएल लोक देशातून लढाईला सज्ज होऊन बाहेर निघाले. (निर्गम १३: १८)
कारण देव अव्यवस्था माजविणारा नाही. (१ करिंथ १४: ३३)
त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असे; दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. (निर्गम १३: २१-२२)
हे देवाचे त्याच्या लोकांसाठी २४x७ संरक्षण आणि उपस्थिती विषयी बोलते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०