कुटुंबाचे तारण
मोशेने म्हटले, आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यांसह जाऊ; आमचे मुलगे, आमच्यामुली, आमची शेरडेमेंढरे आणि आमची गुरेढोरे ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार; कारण परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला उत्सव करावयाचा आहे; तोत्यांस म्हणाला, मी तुम्हांला तुमच्या मुलांबाळासह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो! खबरदार; तुमच्या मनात वाईट हेतू आहे. असे होणार नाही; तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा; कारण तुम्ही तरी हेच मागत आहा. मग त्यांस फारोपुढून घालवून दिले. (निर्गम १०: ९-११)
फारो ने पुरुषांना जाण्याची परवानगी दिली परंतु स्त्रिया, मुलेबाळे आणि शेरडेमेंढरे नाही. आम्ही आमच्या जवळ जे सर्व काही आहेत्याद्वारे देवाची उपासना केली पाहिजे. मोशेने योग्यपणे असा व्यवहार नाकारला. त्यानेत्यात तडजोड होऊ दिली नाही:
तर आता ह्या एकदांच माझ्या पापांची क्षमा करा आणि ही एवढी मरणावस्था माझ्यापासून दूर व्हावी म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यापाशी विनंती करा. (निर्गम १०: १७)
देवाने लहानसे टोळ वापरलेकीफारो ला नम्र करावे. परमेश्वर मोठमोठया गोष्टींना नमविण्यासाठी क्षुल्लकलहानगोष्टींचा उपयोग करू शकतो किंवा करेल.
शत्रू नेहमीच उपासना करण्याच्या आपल्या योग्यतेला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो
मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा; तुमची शेरडेमेंढरेव गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत; तुमच्या मुलांबाळांनाही तुमच्याबरोबर घेऊन जा. (निर्गम १०: २४)
पुन्हा फारो शेरडेमेंढरे सोडून त्यांच्याबरोबर सर्व काही घेऊन जाण्यास परवानगी देत आहे. मोशेने पुन्हा योग्यपणे तो व्यवहार सुद्धा नाकारला कारण फारो ला पाहिजे होते की देवाची उपासना करण्यास इस्राएलच्या योग्यतेला कमी करावे.
मोशे म्हणाला, आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्यासाठी यज्ञपशु व होमबली तूं आमच्या हवाली केले पाहिजेत; आमचे पशुही आमच्याबरोबर गेले पाहिजेत, एक खुरही मागे राहता कामा नये; कारण ह्यातूनच आमचा देव परमेश्वर ह्याच्या सेवेसाठी यज्ञपशु घ्यावे लागतील; आणि परमेश्वराच्या सेवेला काय लागेल ते आम्हांला तेथे जाऊन पोहचेपर्यंत कळावयाचे नाही. (निर्गम १०: २५-२६)
जेव्हा सैतानाने ईयोब वर आक्रमण केले तेव्हा त्याने पशुप्राण्यावर आक्रमणकेले कारण तो ईयोबाची उपासना करण्याच्या योग्यतेला अडथळा करीत होता. (ईयोब १)
अनेक वेळेला, चर्च किंवा सेवाकार्यात चर्च च्या गायकवृंद वर शत्रूचे आक्रमण होते. शत्रू ते सर्व काही करण्याचा प्रयत्न करेल किंवाकरतोकी उपासना करण्याच्या तुमच्या योग्यतेला अडथळा आणावा.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०