मत परमेश्वराने मिसर देशांत मोशे व अहरोन ह्यांना सांगितले की, हा महिनातुम्हांला आरंभीचा महिना व्हावा; तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. (निर्गम १२: १-२)
यहूदी कॅलेंडर वर निसान हा पहिला महिना आहे
जवळजवळ सार्वत्रिक तारीख: मार्च-एप्रिल
इस्राएलच्या सर्व मंडळीला बोल, हे म्हणत: "ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपआपल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एकाएका घराण्यामागे एकएक कोकरू घ्यावे.' (निर्गम १२: ३)
वल्हांडणाचा सण ह्या महिन्यात येतो.
घराण्याचे तारण
इस्राएलच्या सर्व मंडळीला बोल, हे म्हणत: "ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपआपल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एकाएका घराण्यामागे एकएक कोकरू घ्यावे.' (निर्गम १२: ३)
परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले, घराण्याप्रमाणे एकाएका घराण्यामागे एकएक कोकरू घ्यावे. तेप्रत्येक घराण्यासाठी एक कोकरू असे होते. हे आपल्याला सांगते की प्रभु येशू ख्रिस्त, जो आपला वल्हांडणाचा खरा कोकरू आहे, हा संपूर्ण घराण्याचे तारण व्हावे म्हणून आहे.
म्हणून तुमची मुलेबाळे ही आशीर्वादित आहेत एकदाकी तुम्ही येशूला प्राप्त केले. तुमचे अविश्वासी जोडीदार आणि आजी-आजोबा हे सुद्धा आशीर्वादित होतील, कारण येशू हा तुमच्या संपूर्ण घराण्यासाठी कोकरू असा आहे. तुमचे प्रियजन जे अविश्वासी आहेत ते तारण पावलेल्यांद्वारे आशीर्वादित होतील.
बायबल म्हणते की पवित्र जण हे अपवित्र जणांस पवित्र करतील (१ करिंथ ७: १४). होय, त्यांना अजूनही येशूला त्यांचा तारणारा म्हणून स्वीकार करावयाचा आहे, परंतु परमेश्वराने त्यांना तारणासाठी शिक्कामोर्तब केले आहे कारण तुम्ही तारण पावला आहात!
आज, जर एक व्यक्ति येशूला-देवाच्या कोकऱ्याला स्वीकारतो –तर तारणारा हा तेथे निवास करणाऱ्या सर्वांसाठी उपलब्ध आहे.
यहोशवा २४: १५ मध्ये आपण वाचतो, "परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्याची, किंवा तुम्ही राहत आहा त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार."
यहोशवा ने परमेश्वराची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या निर्णयाने त्याच्या घराण्यावर प्रभाव केला.
तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही जसे बेखमीर झाला आहा तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. ( १ करिंथ ५: ७)
ज्या घरांत त्याचे मांस खावयाचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. (निर्गम १२: ७)
तेव्हा कोकरू हे कापले जाते, आणि त्याचे रक्त दारबाह्यांवर व चौकटीच्या कपाळपट्टीला लावले जाते (निर्गम १२: ७), असेकी ते वधस्तंभा विषयी बोलते. आज, विनाश करणाऱ्याने प्रत्येक कुटुंबाला सोडून पुढे जावे जे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील पूर्ण केलेल्या कार्यावर विश्वास ठेवतात, आणि त्यांचा विश्वास त्याच्या रक्ता मध्ये ठेवतात, कारण तेथे अगोदरच मृत्यू होता. रक्त ते सिद्ध करते- निष्पाप कोकरा दोषी कुटुंबासाठी!
बेखमीर भाकरीचा उत्सव
मध्यरात्रीअसे झाले कीमिसरदेशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुरांढोरांपैकी सर्व प्रथमवत्स परमेश्वराने मारून टाकिले. रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसरी लोक जागे झाले; आणि मिसर देशांत मोठा हाहा:कार उडाला, कारण ज्यांत कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते. (निर्गम १२: २९-३०)
हे फार मनोरंजक आहे हे पाहणे की परमेश्वराने मिसरी लोकांनाशिक्षा करण्यासाठी मध्यरात्री निवडली. तुम्ही त्यास योगायोग म्हणा, मी त्यास महत्वपूर्ण म्हणेन
त्यांच्याबरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला;
तशीचशेरडेमेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. (निर्गम १२: ३८)
मिश्र समुदाय कदाचित विश्वास ठेवणाऱ्या मिसरी लोकांस म्हटले असेन. ते ज्यांनी परमेश्वराचे सामर्थ्य पाहिले होते त्यांनी परमेश्वराच्या मागे चालण्याचे निवडले होते.
चारशेतीस वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. (निर्गम १२: ४१)
हे दुतांसारख्या अस्तित्वाबद्दल बोलते
परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर आणिले ह्यांकरीता
परमेश्वराप्रीत्यर्थ ही जागरणाची रात्र आहे; इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या परमेश्वराप्रीत्यर्थ ही जागरणाची रात्र आहे म्हणून अवश्य पाळावी. (निर्गम १२: ४२)
हे रात्रीच्या प्रार्थनेसाठी सामर्थ्यशाली संदर्भ आहे
येशू आणि वल्हांडणाच्या कोकऱ्यामध्ये 12अद्भुत समानता
१. १४वा दिवस
वल्हांडणाचा कोकरा हा वल्हांडणाच्या रात्री कापला जात होता, निसान महिन्याच्या १४व्या दिवशीच्या दुपारी, जे यहूदी कॅलेंडर चा पहिला महिना आहे.
येशू, देवाचा कोकरा हा पहिल्या महिन्याच्या १४व्या दिवशी अर्पण केला गेला.
२. निष्कलंक
कोकरा हा निष्कलंक असला पाहिजे होता.
येशू निष्कलंक होता. तो निष्पाप होता. (१ पेत्र १: १९)
३. एक वर्ष
कोकरा हा एक वर्षाचा असला पाहिजे होता. त्याच्या तारुण्यातील.
येशू हा त्याच्या जीवनाच्या महत्वाच्या समयात होता जेव्हा त्यास एक तरुण असे अर्पण केले गेले.
४. पुरुष
कोकरा हा अवश्य नर असावा.
येशू पृथ्वीवरमनुष्य असा आला. (१ योहान ३: ५)
५.प्रत्येकजण
प्रत्येक घराणे आणि प्रत्येक कुटुंबाकडे त्याचा स्वतःचाकोकरा असला पाहिजे होता.
प्रत्येकाला त्यांचे स्वतःचे अंत:करण उघडावयाचे आहे जे येशूने त्यांच्यासाठी केले आहे आणि व्यक्तिगतरित्या त्यास त्यांचा प्रभु आणि तारणारा असे स्वीकारावे.
६. चार दिवस
कोकऱ्याला 14 तारखेच्या 4 दिवस अगोदर घरात आणले पाहिजे.
वल्हांडणाच्या आदल्यारात्रीच्या अगोदर वधस्तंभावरील त्याच्या मृत्युच्या चार दिवस अगोदर, येशूला गाढवावर यरुशलेम मध्ये आणले गेले.
७. तुटलेली हाडे
इस्राएली लोकांना कोकऱ्याचे हाड मोडण्याची परवानगी नव्हती. शिजविण्यावेळी नाही आणि खाताना सुद्धा नाही.
दाविदाने पवित्र आत्म्या द्वारे प्रेरित होऊन लिहिले, "त्याची सर्व हाडे तो सांभाळीतो; त्यांतले एकही मोडत नाही" (स्तोत्रसंहिता ३४: २०). येशूचे कोणतेही हाड मोडले गेले नाही.
८. काहीही उरलेले नाही
वल्हांडणाच्या आदल्यारात्रीकोकऱ्यास पूर्णपणे भस्म करण्यात यावे. रात्रभर काहीही राहू देऊ नये.
येशूला त्याच्या वधस्तंभावरून त्याच संध्याकाळी काढून टाकण्यात आले, जरी ते परंपरेनुसार नव्हते.
९. प्रथम जन्मलेला
इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्याच्या ठिकाणी कोकरा मरण पावला.
येशू आपल्या ऐवजी मरण पावला. तो वधस्तंभावर मरण पावला जेणेकरून आपल्याला पित्याबरोबर एक करावे.
१०. रक्त
इस्राएली लोकांना देवासाठी चिन्ह म्हणून त्यांच्या दाराच्याचौकटीच्या कपाळपट्टीवर रक्त लावावयाचे होते.जो कोणी कोकऱ्याच्या रक्ताच्या आड लपला आहे तो देवाच्या मिसरी लोकांवरील न्यायापासून सुरक्षित होता. जो कोणी येशूच्या रक्ताच्या मागे लपतो तो न्यायापासून सुरक्षित आहे.
११. मुक्ती
कोकऱ्यानेमिसर मधील वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तीचा एक मार्ग उघडला.
येशूचे अर्पण आपल्याला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करते.
१२. भस्म होणे
वल्हांडणाच्या आदल्यारात्रीकोकऱ्यास पूर्णपणे भस्म करण्यात यावे.
आपल्याला येशूला आपल्या जीवनात घ्यायचे आहे आणि दररोज त्याचे वचन आत्मसात करावयाचे आहे. आपण सुद्धा प्रभूभोजनाच्या वेळी चिन्हात्मक रित्या त्याचे मांस सेवन करतो आणि रक्त ग्रहण करतो.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०