चमत्कार सेवाकार्याचे गुपित
जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तूं बोल. (निर्गम ७: २)
चमत्काराचे गुपित हे ते बोलणे आहे जे देवाने बोलण्यास सांगितले आहे. परमेश्वर त्याचे वचन निश्चित करेल तुमचे नाही.
त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभु त्यांच्याबरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करीत होता. आमेन(मार्क १६: २०)
आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्राएल लोकांस बाहेर काढीन तेव्हा मिसऱ्यांस कळेलकी, मी परमेश्वर आहे. (निर्गम ७: ५)
ही एक गोष्ट आहे की व्यक्तिगतरीत्या परमेश्वराला ओळखावे आणि ही दुसरी गोष्टकी हे जाणावे की तो प्रभु आहे. मिसरी लोकांस परमेश्वराबरोबर व्यक्तिगत संबंध नव्हते परंतु न्यायाच्या सामर्थी कार्यास पाहून ते म्हणतात की तो प्रभु आहे.
मोशे व अहरोन यांनी तसे केले; परमेश्वराने त्यांस आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले. मोशे व अहरोन यांनी फारोशी हे बोलणे केले तेव्हा मोशे ऐंशी वर्षाचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षाचा होता. (निर्गम ७: ६-७)
मागे बायबल ने आपल्याला सांगितले आहे की मिर्याम ही मोशे पेक्षा वयाने मोठीहोती आणि आता बायबल आपल्याला पुन्हा सांगत आहे की अहरोन मोशे पेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठा आहे. मोशे हा भावंडांमध्ये सर्वांत लहान होता.
म्हणूनजवळजवळ तीन वर्षे किंवा जास्त होते जेव्हा फारो ने आदेश दिला होता की बाळांना नील नदीत फेका कारण अहरोन हा अगोदरच जन्मलेला होता.
चमत्कार तुमच्या अधिकारास सिद्ध करते
तुम्ही स्वतः काही अद्भुत कृति दाखवा असे फारो तुम्हांस म्हणेल तेव्हा तूं अहरोनास सांग, आपली काठी घेऊन फारोपुढे टाक म्हणजे तीचा साप होईल. (निर्गम ७: ९)
७: १४-२५ पाण्याचे रक्त झाले
पहिली पीडा जी मिसरावर आली की पाण्याचे रक्त झाले. पहिला चमत्कार जो येशूने योहानाच्या शुभवर्तमान मध्ये केला की त्याने पाण्याचा द्राक्षारस केला. मला वाटते ते वैचित्र्यपूर्ण आहे, कारण रक्त हे बायबल मध्ये न्याया विषयी बोलते, तर द्राक्षारस सामान्यतः आनंद विषयी बोलते. मोशे ने न्याय आणला, परंतु येशूने आनंद आणला.
योहान १: १७ कारण नियमशास्त्र हे मोशे द्वारे देण्यात आले, अनुग्रह आणि सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रकट झाले.
७: ८-१३ सैतानाचा नकलीपणा
जेव्हा अहरोनाची काठी साप झाली, मिसराच्या जादूगारांनी तसेच केले. जेव्हा मोशे च्या काठी ने पाण्यावर मारले आणि त्यास रक्ता मध्ये बदलले, मिसराच्या जादूगारांनी तसेच केले.
पौल २ तीमथ्यी मध्ये आपल्याला सांगतो की, ह्या जादूगारांची नावे ही यान्नेस व याम्ब्रेस आहेत. हे फारच धक्कादायक हे जाणणे की जादुगार सुद्धा ते चमत्कार करण्यास समर्थ होते जे मोशे ने केले होते.
लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बायबल वाचता, आणि तुम्ही जेव्हा जीवनातून चालता, की तो सैतान हा मूळ व्यक्ति नाही. जे सर्व काही तो करतो, ते कोणत्या न कोणत्या प्रकारे, आकार, रचने द्वारे देवाची नक्कल केलेली असते. सैतानाकडे सामर्थ्य आहे, परंतु नवीनता नाही.
उजव्या हातावर किंवा माथ्यावर दुष्टाचे चिन्ह, ही कल्पना देवाकडून चोरलेली आहे, कारण त्याने त्याच्या लोकांना त्याच ठिकाणी शिक्कामोर्तब करण्याचे आश्वासन दिले आहे.खोटया संदेष्ट्याद्वारे देवाचे संदेष्ट्ये नकली असे केले गेले आहेत.
स्वर्गाचे चिन्ह जे देवाने ठेवले आहे, सैतानाने त्यास खगोलशास्त्र असेविकृत केले आहे.
म्हणूनयान्नेस व याम्ब्रेस हे मोशे ला त्याच चमत्कारांच्या चिन्हाने विरोध करीत आहेत.
मनोरंजक गोष्ट ही आहे की जादुगार रक्तालापुन्हा पाण्यात परिवर्तीत करू शकले नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०